
पुणे शहरात पुन्हा हिट ऍण्ड रन, ऑडी कार चालकाने युवकाला चिरडले…
पुणे: पुणे शहरात पुन्हा हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. कोरेगाव पार्क परिसरात गुगल बिल्डिंगसमोर भरधाव आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना उडवले असून, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
गुरुवारी (ता. १०) मध्यरात्री 01.30 ते 1.35 वाजण्याच्या सुमारास एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलिशान ऑडी कारने MH12 NE 4464 पहिल्यांदा एक्टिवावरील तिघांना धडक दिली. या घटनेमध्ये ते तिघे किरकोळ जखमी झाले. त्यानंतर पुढे एक्सेस गाडीवरून जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने चालक रौफ अकबर शेख (वय २१) गंभीर जखमी झाला. त्यानंतर जखमी अवस्थेत नोबल हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
कारचालक दारुच्या नशेत असल्याची प्रथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघात झाल्यावर चालक भरधाव वेगात कार घेऊन पळून गेला. या अपघातात रौफ अकबर शेख या दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला आहे. या आलिशान कारच्या चालकाने २ दुचाकींना धडक दिली यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.
अपघात झालेल्या परिसरातील सीसीटिव्हीच्या माध्यमातून कारचा नंबर काढण्यात आला, त्यानंतर त्या कारचालकाचा मोबाईल नंबर काढून त्यावरून पत्ता मिळवण्यात आला आहे. या अपघात प्रकरणातील कारचालकाचे नाव आयुष प्रदीप तयाल (वय 34, रा. हडपसर) याला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
याप्रकरणी कलम 105,281, 125(a), 132 119,177,184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई पोलिस करत आहेत. पुणे शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनच्या वाढत्या घटनांवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले…
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…
भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; आमदार म्हणतात…
पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीने लिहिलेला निबंध आला समोर…
नागपूरमध्ये भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडलं…
नशिब बलवत्तर! पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताचा धक्कादायक Video समोर…
क्लास वन अधिकारी अन् सासऱ्याची सुपारी; कसा उलगडा झाला पाहा…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

