सासरा आणि सुनेचे अनैतिक संबंध अन् गप्प राहिलेल्या सासूने अखेर…

पाटणा (बिहार) : सासऱ्याचे आणि सुनेशी अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सासूने तब्बल दहा वर्षं विरोध केला. पण, तिला हे सहन झाले नाही आणि तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जमुईमध्ये घडली आहे. संपतिया देवी असं मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

सासरा-सुनेच्या संबंधांना विरोध केल्याने तिला नवरा, सून आणि मुलगा मारहाण करत असल्यामुळे ती मुलींकडे राहत होती. कधी तरी ती घरी यायची. या वेळी आल्यावर तिने या दोघांच्या संबंधांना विरोध केला, यानंतर तिला सर्वांनी मारहाण केली. यामुळे कंटाळलेल्या संपतिया देवीने जीवन संपवले. या घटनेनंतर महिलेचा पती, मुलगा आणि सून फरार झाले आहेत.

झाझा पोलिस स्टेशन हद्दीतल्या बलियोडीह गावातली ही घटना आहे. मृत संपतिया देवी (वय 55) यांचा नवरा बलदेव यादव याचे त्याच्या सुनेशी 10 वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत, असा आरोप आहे. पती आणि सून यांच्यातल्या अनैतिक संबंधांला महिला कंटाळली होती. शिवाय, सातत्याने मारहाण होत असल्याचे असह्य झाल्याने तिने विषप्राशन करून आत्महत्या केली. मृत महिलेच्या मुलीने ही हत्या असल्याचा आरोप केला आहे.

ललिता या मुलीने आईच्या मृत्यूला वडील, भाऊ आणि वहिनीला जबाबदार धरले आहे. या तिघांनी आईला विष देऊन मारलं असा तिचा आरोप आहे. ‘अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे ते आईला मारहाण करायचे. तिला जेवू घालत नव्हते. या वेळी मारहाण करून तिला विष पाजून मारहाण केली आणि सगळे पळून गेले’, असा आरोप ललिता हिने केला.

पोलिस स्टेशन प्रभारी संजय कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपतिया देवीने सुनेशी वाद झाल्यावर विषप्राशन करून जीवन संपवल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी जमुई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

धक्कादायक! सासऱ्याकडून गर्भवती सूनेसह नातवाची वार करून हत्या…

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत केलं लग्न…

सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार; तक्रार दाखल…

सूनेचे सासऱ्याशी होते अनैतिक संबंध अन् एक दिवस…

धक्कादायक! नवरा म्हणायचा; मला आवडत नाहीस, तुझे अनैतिक सबंध…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!