धक्कादायक! पत्नीचा मोबाईल तपासला अन् बसला मोठा धक्का…

सोलापूर: मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना मंगळवेढा परिसरात घडली आहे. तीन मित्रांनी विवाहितेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. मित्रांच्या अत्याचाराला कंटाळून विवाहित महिलेने तलावात उडी घेऊन आयुष्य संपवले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मृत विवाहितेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने तिचा मोबाईल तपासला असता धक्कादायक गोष्ट समजली. मृत महिलेचा पती आणि मुलं हे सर्वजण पुण्यात कामानिमित्ताने राहतात. ते सगळे आपल्या मूळगावी आले होते. तीन पैकी एक आरोपी हा त्यांचा नातेवाईक आहे. तर तीन आरोपी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. नातेवाईक असलेला आरोपी कायम मृत महिलेच्या घरी येत-जात होता. त्यामुळे पतीलाही कधी संशय आला नाही.

पत्नीबाबत माहिती समजल्यानंतर पती तातडीने तलावाजवळ पोहोचला. तिथे पत्नीचा फोन आणि चपला होत्या. नागरिकांनी महिलेला बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे मृत घोषित करण्यात आले. महिलेचा मोबाईल तपासल्या नंतर तीन मित्र तिला सतत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होते. शिवाय, तिला त्रास देत असल्याचे समोर आले आहे. त्याच त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, पतीने पोलिसांना फोन आणि पुरावे दाखवले असून त्याने तिघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! सोलापूरमध्ये महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या…

हृदयद्रावक! लग्नासाठी मुलगी बघायला निघाला अन् मृत्यू झाला…

पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….

पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…

वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!