पोलिसाचे स्वप्न राहिले अधुरे; प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला अन्…

अमरावती : एका युवकाने काही दिवसांपूर्वीच पोलिस भरतीची परीक्षा दिली होती. मात्र, प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांना केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

निलेश प्रकाशराव गुजर (वय २७) असे मृत युवकाचे नाव आहे. तो अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरामध्ये राहता होता. घरात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. दोनच दिवसांपूर्वी त्याने पोलिस भरतीची परीक्षा सुद्धा दिली होती. मात्र, शुक्रवारी (ता. २३) घरातील सर्व सदस्य शेगावला दर्शनासाठी गेल्यानंतर निलेशने आपल्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल करुन संवाद साधला. या दोघांमधील संभाषणानंतर निलेशने स्वत:चे जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. निलेश आणि त्याच्या प्रेयसीमध्ये यावेळी नेमकं काय बोलणं झालं, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, निलेशची प्रेयसी ही त्याला वारंवार पैशांची मागणी करत होती, तसेच मानसिक त्रास देत होती. प्रेयसीच्या याच त्रासातून निलेशला आत्महत्या करण्यास त्याच्या प्रेयसीने प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप निलेशच्या नातेवाईकांनी केला आहे. या संदर्भात निलेशच्या प्रेयसीवर आणि तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निलेश याच्या नातेवाईकांनी केली आहे.

सावधान! Tinder गर्लचा स्कॅम, दोन तासाच्या डेटसाठी बील किती पाहा…

एकतर्फी प्रेमाच्या जाचाला कंटाळलेल्या युवतीने घेतला जगाचा निरोप…

प्रेमात पडलेल्या दोघांच्याही जीवनाचा अखेर शेवट झाला…

मामी आणि भाच्याचे प्रेमसंबंध! नातेसंबंधांना लाजवेल अशी एक घटना…

प्रेमविवाहानंतर दाजीने केला एकुलत्या एका मेव्हण्याचा खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!