
धक्कादायक! मामीसोबत प्रेमसंबध असल्याचे पत्नीला समजले अन्…
पाटणा (बिहार) : मामीच्या प्रेमात वेडा झालेल्या भाच्याने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना भागलपूर येथे घडली आहे. पत्नीला प्रथम ॲसिड पाजलं आणि नंतर तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांनी आरोपी पती व त्याच्या मामीला अटक केली आहे.
नवगछियाच्या रंगरा पोलीस स्टेशन परिसरातील जहांगीरपूर बैसी गावात ही घटना घडली आहे. गावात राहणाऱ्या फैयाज याचे लग्न खारीक पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी शबनम खातुन हिच्याशी दोन वर्षांपूर्वी झाले होते. काही दिवसांनंतर शबनमला तिचा पती फैयाजचे त्याची मामी रिना खातुनशी विवाहबाह्य लैंगिक संबंध असल्याचा संशय आला. तिने या गोष्टीला विरोध केला. पत्नीने विरोध केला असता फैयाज आणि त्याची प्रेयसी मामी यांनी शबनमला मारहाण करण्यास सुरुवात केली.
शबनमची आई शमीमा यांना फैयाज व रीना यांनी त्यांच्या मुलीची हत्या करून मृतदेह गायब केल्याची माहिती समजली. यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी रंगरा पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपी फैयाज व त्याची मामी रिना यांना अटक केली, अशी माहिती नवगछियाचे एसडीपीओ ओम प्रकाश यांनी दिली.
फैयाज व रिनाने पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपी फैयाज व त्याची प्रेयसी मामी यांनी शबनमची हत्या केली. त्याला तिला ॲसिड पाजले आणि नंतर गळा आवळून खून केला. आरोपींनी शबनमचा मृतदेह कोसी नदीत फेकल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून घटनेत वापरलेली ॲसिडची बाटलीही जप्त केली आहे. पुढील तपास करत आहोत.’
Video: मामीने पळून जात बांधली भाचीशी लग्नगाठ; 3 वर्षांपासून रोमान्स…
शंकास्पद! कोलकता येथील ट्रेनी डॉक्टरच्या शरीरात 150mg वीर्य…
वहिनी आणि दिराचे अनैतिक संबंध! नवऱ्याला चहा द्यायची अन्…
अजब घटना! पती नोकरीनिमित्त बाहेरगावी अन् पत्नीने केला १२ वेळा गर्भपात…
वाईट नजर! वहिनीच्या बेडरूममध्ये घुसला दीर अन् पुढे…
मामी आणि भाच्याचे प्रेमसंबंध! नातेसंबंधांना लाजवेल अशी एक घटना…

