
नाशिकमध्ये एक व्यक्ती पोलिसांची गाडी किंवा पोलिस दिसताच काढता पाय घ्यायचा…
नाशिकः नाशिकमध्ये जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि दीड वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस गुंडा विरोधी पथकाने बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
दिनांक ११/०६/२०२४ रोजी गुंडा विरोधी पथकातील पोलिस अंमलदार नाशिकरोड रेल्वे स्टेशन, उपनगर पोलिस ठाणे हद्दीत गस्त करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रिक्षा चालक संजय जाधव नावाचा एक व्यक्ती पोलिसांची गाडी किंवा पोलिस दिसताच असेल त्या ठिकाणावरुन संशयास्पदरित्या निघुन जातो अशी बातमी मिळाली होती. सदरची माहिती पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांना देवुन त्यांचे सुचनेनुसार प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त (गुन्हे), संदीप मिटके, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार प्रविण चव्हाण व गणेश भागवत यांनी दोन दिवस सतत नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसर, देवळाली कॅम्प भागात संशयीताची अधिक माहिती काढून शोध घेतली १३/०६/२०२४ रोजी देवळाली कॅम्प परिसरात संशयीत संजय जाधव मिळून आला असता त्यास सापळा रचून ताब्यात घेतले. विचारपुस करत असताना बोलण्यावरुन अधिक संशय आल्याने त्याची कसून चौकशी करता त्याने त्याचे नाव सुशिल उर्फ गोरख रामभुल बेद (वय-३७ वर्षे रा. फ्लॅट नं १४, पार्क अव्हॅन्यु, भारत गॅस गोडावुन समोर, देवळाली कॅम्प, नाशिक) असे सांगितल्याने त्याची नाशिक शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील माहिती काढली असता सदर संशयीत हा नाशिकरोड पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. २५/२०२३ भादंविक ३०७ वगैरे प्रमाणे दिनांक १९/०१/२०२३ रोजी दाखल असलेल्या गुन्हयातील फिर्यादी सोनसिंग शिकलकर व साक्षीदार अनमोलसिंग शिकलकर यांना आरोपी शंकर चावरीया, शुभम चावरीया व गोरख बेद यांनी वास्को चौक नाशिकरोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढुन जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार व लोखंडी रॉडने डोक्यास मारहान केली म्हणुन गुन्हा दाखल होता.

गुन्हा दाखल झाले पासून आरोपी सुशिल उर्फ गोरख रामभुल बेद हा आपले स्वत:चे अस्तित्व लपवुन फरार होता. गुंडा विरोधी पथकाने त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाईकामी नाशिकरोड पोलिस ठाणेचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, पोलिस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त (गुन्हे), संदीप मिटके, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस अंमलदार मलंग गुंजाळ, डी. के. पवार, विजय सुर्यवंशी, राजेश सावकार, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, प्रविण चव्हाण, निवृत्ती माळी, अक्षय गांगुर्डे, गणेश नागरे, नितीन गौतम, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.
संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
नाशिक पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…
नाशिक पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची काढली वरात…
नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भुसावळमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला ठोकल्या बेड्या…
नाशिकमध्ये महिनाभरात लाखो रुपयांचा गुटखा जप्त; टवाळखोरांवर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

