भीषण अपघात! पुणे शहरात ट्रकने दोन महाविद्यालयीन युवकांना चिरडले…

पुणे : पुणे शहरातील नगर रस्त्यावर खराडी जकात नाका येथे भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली आणि दोन महाविद्यालयीन युवकांचा चिरडल्याची घटना सोमवारी (ता. २७) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे.

ट्रक वाघोलीहून पुण्याच्या दिशेने निघाला होता. तेव्हा खराडीतील जकात नाका चौकात ट्रकने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचे नाव श्यामबाबू रामफळ गौतम असे आहे.

जकात नाक्यावर सिग्नलला दुचाकी थांबली होती. त्या दुचाकीला ट्रकने जोराची धडक दिली. दुचाकीवर असलेले तिघेही या ट्रकसोबत फरफटत गेले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. अपघातातील एकाचे नाव आदिल शेख असे आहे तर इतरांची नावे समजू शकली नाही. अपघातग्रस्त लातूर येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अपघाताची नोंद पोलिसात झाली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

पुणे अपघात प्रकरणी ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक; ब्लड सॅम्पलची…

धक्कादायक अनुभव! पुणे अपघात आणि आरटीओचा अंदाधुंद कारभार…

पुणे शहरात भीषण अपघातात युवकाचा मृत्यू; धक्कादायक Video…

पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!