पुणे शहरामधील वाहतुकीत मोठा बदल; पाहा पर्यायी मार्ग…

पुणे : पुणे शहरातील मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरच्या बांधकामामुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. सिमला ऑफिस चौकाजवळ हे बांधकाम होणार असून या परिसरातील वाहतूक आजपासून (शुक्रवार ता. १७ मे) बदलणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला असून कोणत्या मार्गावर प्रवेश बंद राहील आणि कुठून मार्ग बदलले आहेत याची माहिती वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी दिली.

सिमला ऑफिस चौक परिसरात काम सुरू असल्यामुळे वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (एसटी. स्टँड मार्ग) सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात येत आहे. वीर चाफेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहणार आहे.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे…
वीर चाफेकर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूकडील सेवा रस्त्यावरून चाफेकर चौक डावीकडे वळून न.ता. वाडी – उजवीकडे वळण घेउन सिमला ऑफिस चौकाकडे जाता येईल.
फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून वीर चाफेकर चौकातून सिमला ऑफिस चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : चाफेकर चौक – सरळ न.ता. वाडी चौक उजवीकडे वळून सिमला ऑफिस चौक.- न. ता. वाडी चौक ते वीर चाफेकर चौक प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग – न.ता.वाडी चौकातून डावीकडे वळून सरळ सिमला ऑफिस चौक- उजवीकडे वळून चाफेकर चौक
स. गो. बर्वे चौकाकडून सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे प्रवेश बंद राहील.
वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी. चौक ते सिमला ऑफिस रस्त्यावर सर्व वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे.

दरम्यान, मेट्रोचे सिमला ऑफिस चौकात काम पूर्ण होईपर्यंत परिसरातील वाहतूक करण्यात आलेले बदल कायम राहणार आहेत. गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी

स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!

विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!

शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!

रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!

संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!