
अमरावती हादरली! जागेच्या वादातून आई आणि मुलाची पहारीने हत्या…
अमरवती : अमरावतीत जागेच्या वादातून आई आणि मुलाची पहारीने हत्या करण्यात आली असून, वडील थोडक्यात बचावले आहे. ही खळबळजनक घटना अमरावती शहरातील मंगलधाम परिसरातील बालाजी नगर परिसरात सोमवारी (ता. २९) दुपारी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी पथकासह घटना स्थळाला भेट दिली. यावेळी परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. आरोपी देवानंद लोणारे आणि पत्नी ज्योति लोणारे यांना पोलिस आयुक्त यांच्या विशेष पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे. आई कुंदा देशमुख (वय 65) आणि मुलगा सुरज देशमुख (वय 25) यांचा मृत्यू झाला आहे. वडिल विजय देशमुख गंभीर हे जखमी झाले आहेत.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
मंगलधाम परिसरातील बालाजीनगरमध्ये देशमुख कुटुंब गेली अनेक वर्षे राहत होते. विजय देशमुख, कुंदा देशमुख, मोठा मुलगा अंकुश आणि लहान मुलगा सुरज असे चार सदस्य राहत होते. लहान मुलगा अंकुश एमआयडीसीमध्ये तर मोठा मुलगा सुरज अमरावतीच्या एका कंपनीत नोकरीला होते. सोमवारी एमआयडीसीला सुट्टी असल्याने सर्वजण घरी होते. देशमुख कुटुंबाच्या घरामोर काही महिन्यापूर्वी लोणारे कुटुंबाने घर खरेदी केले होते.
सोमवारी दुपारी रिकाम्या जागेवरुन देशमुख परिवाराला शिवीगळ करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून कुंदा देशमुख बाहेर आल्या. बाहेर आलेल्या कुंदा देशुमख यांना पाहून देवानंद लोणारचा राग अनावर झाला आणि त्याने बेसावध कुंदा देशमुख यांच्या डोक्यात पहारीने वार केला. आईच्य किंचळण्याचा आवाज ऐकून सुरज बाहेर आला तर त्याच्या डोक्यात देखील वार करण्यात आला. मुलगा आणि पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून विजय देशमुख वाचवण्यासाठी आले तर त्यांच्यावर देखील वार केला. गोंधळानंतर आजबाजूच्या लोकांनी गर्दी केली होती. बघ्यांची गर्दी पाहताच लोणार आक्रमक झाला आणि त्याने पुन्हा मुलावर आणि आईवर वार केले.
दरम्यान, लोणार घरी जाऊन पत्नी आणि मुलाला दुचाकीवर घेऊन फरार झाला. सर्व घटना सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी ताबडतोब गुन्हा दाखल करत लोणारचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. फ्रेजरपुरा पोलिस घटनेचा तपास करत आहेत.
अमरावतीत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू…
अमरावतीमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्याला वाळूच्या ट्रकने चिरडलं…
अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

