
सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात आढळले अर्भक…
पुणेः सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक आढळून आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 17) सकाळी सव्वानऊ वाजता तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार सुनील सगर यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे शहरात एका सार्वजनिक शौचालयात असलेल्या कचऱ्यात अर्भक असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले. त्याला रुग्णालयात दाखल केले करण्याच्या पूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पुरुष जातीचे अर्भक असून त्याचे वय एक दिवस एवढे आहे. अर्भकाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने त्याला अशा प्रकारे टाकून देण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.
निर्दयी! पुणे शहरात कचऱ्यात आढळले नवजात अर्भक…
पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाला नेहाने घातला गंडा…
पोलिसकाका, पुणे पोलिस आयुक्तांची तत्परता! हरवलेली मुलगी सापडली रांजणगावात…
रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

