हृदयद्रावक! पती-पत्नीमध्ये मध्यरात्री वाद झाला अन् घेतला नको तो निर्णय…

लखनौ (उत्तर प्रदेश): पती-पत्नीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विषारी पदार्थ खाल्ल्याची धक्कादायक घटना बिजनौरमध्ये घडली आहे. उपचारासाठी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पतीची प्रकृती चिंताजनक आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या जोडप्याने एक सुसाइड नोट ठेवली आहे.

बिजनौरच्या हल्दौरमध्ये शिवानी शर्मा आणि तिचा पती अंकुर शर्मा यांनी विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान शिवानीचा मृत्यू झाला, तर अंकुर अजूनही रुग्णालयात दाखल आहे. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.

शिवानी आणि अंकुरने त्यांच्या पालकांच्या नावाने एक पत्र ठेवलं आहे. पत्रात म्हटले आहे की, ‘मम्मी, पप्पा… तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं आहे पण आता आमची वेळ आली आहे. आम्ही छोटासा जीव (मुलगी) तुमच्या हातात सोपवत आहोत. जेव्हा तुम्हाला हे पत्र मिळेल तेव्हा आम्ही दोघेही हे जग सोडून गेलेलो असू. आमच्या मृत्यूसाठी आम्ही स्वत:च जबाबदार आहोत.’ या जोडप्याला 8 महिन्यांची मुलगी आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुर रात्री हॉटेलमधून जेवण करून घरी आला होता. मध्य रात्री दोघांमध्ये वाद झाला. काही वेळानंतर दोघांची प्रकृती खालावली आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. या दाम्पत्याने विषारी पदार्थ खाल्ल्याचे निष्पन्न झाले. दोघांनाही तत्काळ बिजनौर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान शिवानीचा मृत्यू झाला आहे तर अंकुरची प्रकृतीही चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.’ पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! उपचार करता न आल्यामुळे मुलीचा मृत्यू अन् वडिलांची आत्महत्या…

हृदयद्रावक! पतीच्या निधनाच्या धक्क्याने पत्नीची आत्महत्या; चिमुकली पोरकी…

हृदयद्रावक! डॉक्टर होणाऱ्या पत्नीला भेटून आला अन् काळाने घातला घाला…

हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…

हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!