
चिमुकल्याने अनैसर्गिक संबंधासाठी विरोध केल्याने केला खून अन्…
ठाणे : दहिसर परिसरातील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक अत्याचार करण्यासाठी अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
मृत मुलाच्या आईने शिळ डायघर पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. तक्रारदार महिलेचा मुलगा 12 वर्षीय मुलगा 25 मार्च रोजी घरातून बाहेर पडला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो परतला नव्हता. या महिलेने आपल्या मुलाचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. शेवटी या महिलेने पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांना तपासादरम्यान हा मुलगा नवी मुंबई परिसरातील तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतावस्थेत आढळला. आडीवली-किरवली गावाच्या हद्दीत असलेल्या एका पाण्याच्या डबक्यात या मुलाला त्याचे हात-पाय बांधून टाकून देण्यात आले होते. मुलाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तक्रारदार महिलेशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. या मुलाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळी पथके स्थापन करून तपास चालू केला. या प्रकरणी पोलिसांनी रमजान मोहम्मद कुद्दूस शेख आणि मोहम्मद आझाद कुद्दुस शेख या दोन आरोपींना अटक केली. तपासादरम्यान या दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
रमजान शेख आणि मृत मुलगा ठाकुरपाडा येथे एकाच परिसरात राहायचे. रमजान मृत मुलाला प्रलोभन दाखवून निर्जन स्थळी घेऊन गेला. तेथे आरोपीने मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने विरोध केल्यामुळे आरोपीने त्याच्या डोक्यात दगड मारून त्याला बेशुद्ध केले आणि कपड्याने त्याचा गळा आवळला. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला होता. मृत मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रमजान शेख याने त्याचा भाऊ मोहम्मद शेख याला बोलावले. दोघांनीही मृत मुलाचे हात-पाय बांधून त्याला पाण्याच्या डबक्यात फेकून दिले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! युवकाच्या गुप्तांगावर झाडल्या तब्बल नऊ गोळ्या…
धक्कादायक! प्रेमविवाहाला मदत केली म्हणून युवकाला बोलेरोखाली चार वेळा चिरडले…
धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…
धक्कादायक! दोन लहान भावांचा कुऱ्हाडीने कापला गळा…
धक्कादायक! सासऱ्याकडून गर्भवती सूनेसह नातवाची वार करून हत्या…

