
सोलापूरच्या प्रियकराने प्रेयसीचे मुंडकं कापून फेकले नदीत…
पालघर : एका प्रियकरानेच आपल्या प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीचे मुंडकं कापून नदीत फेकले होते. पोलिसांनी गुन्हा उघड केला असून, आरोपींना जेरबंद केले आहे. लग्न करून अर्धी प्रॉपर्टी नावावर कर, अशी बळजबरी करत असल्यामुळे खून केल्याची कबुली प्रियकराने दिली आहे.
पालघरमधील मोखाडा येथील वैतरणा नदीपात्रात मागील आठवड्यात शिर नसलेले एक महिलेचे धड आढळून आले होते. पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. सोलापूरमधील सुनील यादव याचे एका महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र, ही महिला वारंवार सुनील यादवला लग्न करून प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्याची बळजबरी करत होती. सततच्या त्रासाला कंटाळून आरोपी सुनील यादव याने आपला साथीदार महेश बडगुजर याच्या मदतीने प्रेयसीची निर्घृण हत्या केली. यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिचं शिर धडापासून वेगळं करून वैतरणा नदीत फेकले होते. फिरायला लोणावळ्याला जाऊ असं सांगत या दोन्ही आरोपींनी या युवतीला इंडिका गाडीत बसवून या ठिकाणी आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, युवतीचा मृतदेह सापडल्यानंतर पालघरच्या मोखाडा पोलीस ठाण्यात कलम 302 आणि 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलीस तपास करत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रकरणात दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे.
दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…
नवरा प्रेयसीसोबत तर पत्नी प्रियकरासोबत गेली पळून; तीन चिमुकल्या रडत आहेत…
धक्कादायक! पुणे शहरात प्रियकराने घरात घुसून प्रेयसीच्या आईचा केला खून…
धक्कादायक! लग्नानंतर 7व्या दिवशी प्रियकरासह पळाली नवरी; जाण्यापूर्वी..
पत्नीला शेतामध्ये प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवरा चिडला अन्…
शारिरीक संबंधावरून मैत्रिणीच्या विवाहीत प्रियकराचे कापले गुप्तांग…

