स्वारगेट पोलिसांनी मोबाईल व दुचाकी चोरट्यांनी केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): दुचाकीवरुन भरधाव वेगाने येवून मोबाईल हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना व दुचाकी चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर हद्दीमध्ये वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या तसेच पोलिस स्टेशन येथे गुन्हे नोंद करण्यात आले होते. स्वारगेट पोलिस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा.पोलिस निरीक्षक प्रशांत संदे तसेच तपास पथकातील पोलिस अंमलदार सुजय पवार, सोमनाथ कांबळे, दिपक खेंदाड, संदीप घुले, शिवा गायकवाड, अनिस शेख व फिरोज शेख यांनी सदर परीसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून तांत्रीक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्कआऊट करुन स्वारगेट एसटी स्टॅन्ड परीसरात वारंवार पेट्रोलींग करीत असताना तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी राजेन्द्र परमेश्वर कदम (वय २४ वर्षे धंदा वाळु सीमेंट सप्लायर्स रा. लक्ष्मीनगर अंबेडकर वसाहत पर्वती पुणे) यास अटक करुन त्याचेकडून तपासादरम्यान ०२ दुचाकी तर एका विधीसंघर्षीत बालकांकडुन ०१ दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

शिवाय, दुचाकी वरुन भरधाव वेगाने येवुन जबरदस्तीने मोबाईल हिसकावुन घेवुन जाणारे आरोपी १) साद शेरअली शेख (वय २२ वर्षे रा. ९३२, सदानंदनगर सोमवार पेठ पुणे), २) उदय सुनिल जाधव (वय २२ वर्षे रा. ९३२, सदानंदनगर सोमवार पेठ पुणे) यांना अटक करुन त्यांचेकडून दाखल गुन्हयात त्यांनी चोरी केलेला मोबाईल व गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आरोपींकडुन दाखल गुन्ह्यांमधील एकुण ०२ लाख १० हजार रुपये किंमतीची ०४ दुचाकी वाहने व एक मोबाईल फोन जप्त करुन एकुण ०४ गुन्हे उघड केले आहेत.

सदरची कामगिरी ही प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, स्मार्तना पाटील, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-२, पुणे शहर, नंदिनी वग्यानी, सहा.पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे यांच्या आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले, पो/अं १००५७ सुजय पवार, पो/अं ८२३९ सोमनाथ कांबळे, पो/अं ९९६३ दिपक खेंदाड, पो/अं ९८२० अनिस शेख, पो/अं १००१६ शिवा गायकवाड, पो/अं १००६२ फिरोज शेख, पो/अं १०१४७ संदीप घुले, पो/अं १००६८ रमेश चव्हाण, पो/अं ३५४१ प्रविण गोडसे यांनी एकत्र मिळुन केली आहे.

स्वारगेट पोलिसांनी महिला चोरटयास केले जेरबंद; गुन्हे उघड…

स्वारगेट पोलिसांनी अट्टल सराईत गुन्हेगारास शिताफीने केले जेरबंद…

स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले जेरबंद…

पुणे शहरात आढळला पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह…

पुणे शहरात तोतया पोलिसाकडून पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!