लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणारा अटकेत…

पुणे (संदिप कद्रे): लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणा-या भामट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लष्कराच्या सदन कंमान्ड येथे ड्रायव्हर म्हणून नोकरी करणा-या व पुर्वी लष्करात नोकरी लावूनदेण्याच्या आमिषाने पैसे घेवून बनावट अपॉयमेन्ट लेटर देवून फसवणुक करणा-या गणेश बाबुलाल परदेशी याने पुन्हा कोंढवा भागातील रामदास माणिकराव देवर्षे यांच्या मुंलीना तसेच त्याच्या इतर नातेवाईकांना त्याची लष्करातील बडया अधिका-याशी ओळख असल्याचे सांगूण लष्करात सिव्हिलियन या पदावर नोकरीला लावतो म्हणुन ८,३२,००० /- रु घेवुन नोकरी न लावता फसवणुक केली होती. त्याबाबत कोंढवा पो ठाणे येथे गुरन.११८९/२०२४, भा.दं.वि. कलम.४०६, ४२०, ४६४ ( अ ), ४६५,४६८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीने गुन्हा केल्यानंतर त्याचा रहाता पत्ता बदलुन दुसऱ्या ठिकाणी राहण्यास जावुन मोबाईल नंबर बदलेले होते. सदर आरोपी यांचा शोध घेण्याबाबत कोंढवा तपास पथकातील लेखाजी शिंदे सहा पोलिस निरीक्षक व त्याचे पथक वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे व पोलिस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना ०८/०३/२०२४ रोजी तपास पथकातील लेखाजी शिंदे सहा. पोलिस निरीक्षक, पोलिस अंमलदार विकास मरगळे, शंशाक खाडे यांना माहिती प्राप्त झाली की, सदर आरोपी हा एन. आय.बी.एम.रोड सांळुखे विहार येथील महालक्ष्मी स्टेशनरी सेंटर येथे ओळख लपवून तोडाला रुमाला बांधुन सामान घेण्यासाठी आला आहे.

गणेश बाबुलाल परदेशी हा स्टेशनरी दुकानातुन सामान खरेदी करुन निघुन चालला होता. त्याच्याकडे बातमीदाराने अंगुली निर्देश करुन सुचित केले असता त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पत्ता गणेश बाबुलाल परदेशी राहणार कृष्ण केवल सोसायटी, एन आय बी एम रोड कोंढवा खुर्द पुणे असे सांगितले. त्यास पोलिस ठाणे येथे आणुन त्याच्याकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर आरोपी याने आणखीन तरुणांना बेरोजगारीचा फायदा घेवून नोकरीचे आमिष दाखवुन फसविले असल्याबाबत माहिती प्राप्त होत असुन त्याबाबत अधिक तपास वैभव सोनवणे सहा पोलिस निरीक्षक हे करित आहे.

संबंधित कामगिरी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलिस उप आयुक्त परि. ०५, गणेश इंगळे, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलिस निरीक्षक दिनेश पाटील, स.पो.नि.पो.हवा. अमोल हिरवे, पो हवा राहुल वंजारी, पो.शि. अभिजीत रत्नपारखी, पो शि शशांक खाडे पो.शि.विकास मरगळे, पो.शि. राहुल थोरात, पो.शि. सुहास मोरे, पो.शि. जयदेव भोसले, पो.शि. अभिजीत जाधव, पो.शि. आशिष गरुड, पो.शि. रोहित पाटील, पोशि अक्षय शेंडगे यांनी केली आहे.

कोंढवा पोलिसांनी नामांकित कंपनीतील चोरीचा गुन्हा केला उघड…

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला कोंढवा पोलिसांनी केली अटक…

पुणे शहरात पिस्टल बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी केली अटक…

कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीला कोयत्यासह केले जेरबंद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!