चिखली पोलिसांनी अल्पवयीन मुलीची हिमाचलप्रदेश मधून केली सुटका…

पुणे (सुनिल सांबारे): चिखली पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करताना फुस लावुन पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची हिमाचलप्रदेश मधून सुटका केली आहे. शिवाय, आरोपी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

२६/०१/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. ते १०.३० चे. सुमारास जाधववाडी चिखली पुणे येथे राहणा-या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी अमीष दाखवुन फिर्यादी यांच्या कायदेशीर रखवालीतुन त्यांच्या संमती शिवाय पळवुन नेले होते. सदरबाबत चिखली पोलिस स्टेशन गु.रजि.नंबर ४१/२०२४, भादवी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

संवेदनशिल प्रकरण असल्याने व.पो.नि. काटकर याच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक उद्धव खाडे व पोलिस अंमलदार यांची एक स्वतंत्र टिम तयार करुन तपास सुरु करण्यात आला. सदरच्या पथकाने जाधववाडी, चिखली परीसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमे-याची तपासणी केली असता त्यांना सदरची मुलगी एका अज्ञात युवकासोबत जात असल्याचे त्यांना दिसुन आले. त्याचा फोटो विकसीत करुन चिखली परीसरात प्रसारीत केला असता सदरचा युवक हा सुरोज रेजाउल शेख (वय २१) हा कुदळवाडी परीसरात चिकन सेंटरवर काम करणारा मुलगा असल्याची माहिती त्यांना मिळाली. प्राथमिक तपासात सदरचा मुलगा हा मुर्शिदाबाद, पश्चीम बंगाल येथील मुळ रहिवाशी असल्याची माहिती मिळाल्याने प्रथमता तपास पथकाने त्यांचे मुळ गावी त्यांचे आई-वडील याचा शोध घेवुन तेथे तपास केला असता तो तेथेही गेलेला नसल्याची माहिती मिळत होती.

आरोपी सुरोज याचा मोबाईल फोन बंद असल्याने त्याचे लोकेशन मिळत नव्हते. त्याच्या संपर्कातील व्यक्तीबाबत माहिती घेता शोईल शेख, हैद्राबाद यांचे तो संपर्कात असल्याचे सिडीआर वरुन दिसुन येत होते. तसेच तो नियमितपणे रुपसिंग ठाकुर या नेपाळी मुलाचे संपर्कात असल्याचे दिसुन आले. रुपसिंग ठाकुर याचे मोबाईलचे तांत्रीक विष्लेषण केले असता तो चंदिगड ते सिमला, हिमाचल दरम्यानच्या पुर्व बाजुकडील गावामध्ये वावरत असल्याची जुजबी माहिती तांत्रीक तपासात समोर येत होती. तात्काळ वरीष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी सपोनि / खाडे, पो. ह. १८५१ अमर कांबळे व पो. ना. १८१३ सुरज सुतार असे पथक हिमाचल प्रदेश या ठिकाणी पाठविले. त्यानी दोन दिवस चंडीगड ते सिमला हिमाचल प्रदेश दरम्यानच्या पुर्व बाजुस असणा-या पहाडी भागातील खेडेगावामध्ये शोध घेत असताना त्याना भोजनगर, ता. परवानु, जिल्हा सोलन राज्य हिमाचल प्रदेश या ठिकाणी एका ठेकेदाराकडे आरोपी सुरज हा मजुरीची काम करत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांच्या तपास पथकाने कौशल्यपुर्वक त्यास ताब्यात घेवुन त्याने फुस लावुन पळवुन नेलेल्या मुलीसही त्याच्या ताब्यातुन मुक्त केले. अशा प्रकाराने अत्यल्प पिडीत मुलीची सुटका हिमाचल प्रदेशासारख्या पहाडी भागात जावुन करण्यात चिखली पोलिस स्टेशनच्या पोलिसांना यश आलेले आहे.

सदरची कामगिरी शिवाजी पवार, पोलिस उपआयुक्त परिमंडळ – ३, पिंपरी चिंचवड, संजय गौर, सहा. पोलिस आयुक्त, भोसरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर काटकर वरीष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस स्टेशन यांचे अधिपत्याखाली सपोनि / श्री. उध्दव खाडे, पोना / अमर कांबळे, पोना / सुरज सुतार, पोना / कबीर पिंजारी यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.

चिखली पोलिसांनी चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…

दिवाळीत महिलांची सोनसाखळी चोरणाऱ्यास चिखली पोलिसांनी केली अटक…

चिखली पोलिसांनी मैत्रिणीस ताब्यात घेत गुजरातमध्ये जाऊन आरोपीस ठोकल्या बेड्या…

परदेशातील कामाच्या बनावट वर्क ऑर्डर; व्हिसा देणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी केली अटक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!