कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा पोलिसांनी तडीपार आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

कोंढवा पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी चेक करुन कोणता तडीपार आरोपी हा विना परवाना चोरुन पोलिस ठाणे हद्दीत राहत आहे का? याबाबत माहिती घेणे बाबत आदेशित केले होते. ०६/०२/२०२४ रोजी पोलिस शि. शशांक खाडे व पोलिस शि. विकास मरगळे यांना त्याच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीतून ०३/०८/२०२२ रोजी तडीपार केलेला आरोपी आफताब उर्फ बडापाडा राजु पठाण (रा. गणेश अपार्टमेन्ट, भाग्योदय नगर, कोंढवा, पुणे) हा पारसी ग्राऊंड, शिवनेरी कोंढवा येथे सिगरेट ओढत थांबलेला दिसला. सदर आरोपीस तात्काळ ताब्यात घेवुन पोलिस स्टेशन येथे आणुन त्याची तडीपारीची ऑर्डरची खात्री केली असता तो तडीपारी संपण्याच्या अगोदर पुणे शहर हद्दीत मिळून आला आहे. वरिष्ठांच्या आदेशाने त्यास पोलिस आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर यांचे तडीपार आदेश नुसार महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १९५१ चे कलम ५६ (१) (अ)(ब) अन्वये पुणे शहर पोलिस आयुक्तलाय पिंपरी शहर पोलिस आयुक्तलय व पुणे जिल्हयातुन १८ महिन्या करीता तडीपार केले असताना सदर आदेशाचा भंग करुन मिळून आल्याने त्याच्या विरुध्द कोंढवा पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली.

सदर कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, रंजन शर्मा, अपर पोलिस आयुक्त पुर्वे प्रादेशिक विभाग, ए. राजा पोलिस उप आयुक्त परि.०५, शाहुराव साळवे, सहा. पोलिस आयुक्त वानवडी विभाग संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पो ठाणे, संदिप भोसले पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा पो ठाणे, मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा पो ठाणे यांच्या मागदर्शनाखाली लेखाजी शिंदे सहा पो.निरी, दिनेश पाटील सहा पो निरी, पो.हवा. अमोल हिरवे, पो.हवा. राहुल वंजारी, पो.अम. अभिजित रत्नपारखी, पो. अम. जयदेव भोसले, पो.अम. राहुल रासगे, पो.अम. सुहास मोरे, पो.अम, राहुल थोरात, पो.अम.अशिष गरुड, पो.अम.रोहित पाटील, पो.अम. अक्षय शेडगे, पो.अम. विकास मरगळे, पो.अम. शशांक खाडे यांचे पथकाने केली.

कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौशल्यपुर्ण सुपरफास्ट कामगिरी…

कोंढवा पोलिसांना नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला दिसला अन् गुन्हे केले उघड…

कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईतांकडून ७ पिस्टल अन् काडतुसे जप्त…

कोंढवा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस १० तासात केली अटक…

कोंढवा पोलिसांनी सापळा रचून केली अटक; १५ दुचाकी जप्त…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!