बोपदेव घाटात विद्यार्थ्यांना लुटणा-या टोळीचा पर्दाफाश…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात रात्रीच्यावेळी बोपदेव घाटात लुटणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात रात्रीच्यावेळी बोपदेव घाटात होणाऱ्या जबरी चोऱ्यांच्या अनुषगांने कोंढवा पोलिस ठाणे हद्दीतील जबरी चोऱ्यांच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याबाबत पोलिस उप-आयुक्त परि-०५, आर. राजा यांनी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेच्या पुर्ततेकामी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले यांनी बोपदेव घाटात साध्या वेशात सापळा रचून कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

तपास पथक अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक दिनेशकुमार पाटील, सहा पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलिस अंमलदार पो. हवा. ६९५१ विशाल मेमाणे, पो हवा ७९ निलेश देसाई, पो. हवा ११६१ सतिश चव्हाण, पो. हवा १४२२ लवेश शिंदे, पो. शि. ४७९ शाहीद शेख, पो. शि. ८५९१ लक्ष्मण होळकर, पो.शि.९८३८ संतोष बनसुडे, असे कोंढवा पोलिस स्टेशन अभिलेखावरील दाखल झालेल्या जबरी चोरी गुन्ह्यांचा तपास करीत असताना त्यांनी बोपदेव घाट परीसरात सापळा रचुन स्टाफच्या मदतीने बोपदेव घाटमाथ्यावर साध्या वेषात रोडच्या बाजूला थांबुन संशयीत वाहने व इसमांचा शोध घेत होते. यावेळी दोन दुचाकी वाहनांवर तीन जण सासवड कडून पुण्याच्या दिशेने येत असल्याचे दिसले. त्यातील एका दुचाकीस पुढील व मागील बाजुस नंबर प्लेट नव्हती. ते घाटमाथ्यावर फिरत असणाऱ्या लोकांकडे पहात आपआपसात बोलत होते. त्यामुळे त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांच्याकडे जावुन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी दोन जणांना ताब्यात घेण्यात यश आले. त्यांचेकडे एक दुचाकी पल्सर आणि एक चाकु मिळुन आला त्यांच्यासोबतचा दुसऱ्या दुचाकीवरील एक जण हा अंधाराचा फायदा घेवुन तेथुन पळुन गेला.

१. नागेश संजय चव्हाण (रा. मोमीन आखाडा राहुरी जि अहमदनगर), २. चेतन सिताराम खैरे (रा. गाव नाझरे कडे पठार, खैरेवाडी ता पुरंदर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सदर आरोपी यांच्याकडे कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीतील व पुणे शहरातील जबरी चोरीच्या गुन्ह्यांच्या अनुषगांने सखोल व कौशल्यपुर्ण तपास केला असता, त्यांच्याजवळील नंबर प्लेट नसलेली पल्सर दुचाकी पल्सर गाडी ही काही दिवसापुर्वी बोपदेव घाटातुन तीन तरूणांना चाकुचा धाक दाखवुन सदरची दुचाकी चोरी करुन नेल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांचेकडे तपास करता त्यांनी सदरची दुचाकी ही चोरुन नेली असल्याबाबत कबुली दिल्याने आरोपींकडुन गुन्हा उघड करण्यात आला आहे.

संबंधित कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलिस उप आयुक्त परि. ०५, शाहुराव साळवे, सहा. पोलिस आयुक्त वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, संदीप भोसले, पोलिस निरीक्षक, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलिस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा पोलिस निरीक्षक दिनेश पाटील, सहा पोलिस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलिस हवालदार/६९५१ विशाल मेमाणे, पोलिस हवालदार / ७९ निलेश देसाई, पोलिस हवालदार / ११६१ सतिश चव्हाण, पोलिस हवालदार /१४२२ लवेश शिंदे, पोलिस अंमलदार/४७९ शाहीद शेख, पोलिस अंमलदार/८५९१ लक्ष्मण होळकर, पोलिस अंमलदार / ९८३८ संतोष बनसुडे, यांच्या पथकाने केली आहे.

कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौशल्यपुर्ण सुपरफास्ट कामगिरी…

कोंढवा पोलिसांना नंबर प्लेटवरील नंबर खोडलेला दिसला अन् गुन्हे केले उघड…

कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईतांकडून ७ पिस्टल अन् काडतुसे जप्त…

कोंढवा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस १० तासात केली अटक…

कोंढवा पोलिसांनी सापळा रचून केली अटक; १५ दुचाकी जप्त…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!