पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची एक वर्षात ऐतिहासिक कामगिरी…

पुणे (संदिप कद्रे): महाराष्ट्र पोलिस दलातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नतीने पोलिस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. रितेश कुमार यांच्याकडे राज्याच्या होमगार्ड महासमादेशकाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुणे शहरात रितेश कुमार यांनी एक वर्षात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

पुणे पोलिस आयुक्तालयातील हडपसर पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार राजू हनुमंत गायकवाड, वय ३९ रा. लेन नं. ०७ कॅनॉल शेजारी, गंगानगर, हडपसर पुणे. हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ४ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर यांनी त्याच्या विरुध्द एम. पी.डी.ए. कायद्यान्वये चंद्रपुर मध्यवर्ती कारागृह, चंद्रपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत.

गुन्हेगार राजू हनुमंत गायकवाड यास स्थानबध्द करण्यामध्ये रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस स्टेशन पुणे व चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा पुणे गजानन पवार, वाचक शाखा पुणे शहर्, राजु बहिरट, पोलिस उप निरीक्षक, पी. सी. बी, गुन्हे शाखा पुणे शहर, शेखर कोळी, सहा पोलिस उप निरीक्षक, पी.सी.बी, गुन्हे शाखा पुणे शहर दिलीप झानपुरे, सहा पोलिस उप निरीक्षक, वाचक शाखा पुणे शहर, योगीराज घाटगे, ५७३९ पोलिस हवालदार, गुन्हे शाखा, पुणे शहर, अविनाश सावंत, १७४७ पोलिस हवालदार गुन्हे शाखा, पुणे शहर, संतोष कुचेकर, ५६६१ पोलिस हवालदार, गुन्हे शाखा, पुणे शहर, सागर बाबरे, ७८४४ पोलिस नाईक, गुन्हे शाखा पुणे शहर, अनिल भोंग, ८६३५ पोलिस अंमलदार गुन्हे शाखा पुणे शहर यांनी सदरची कामगिरी पार पाडली.

पोलिस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलिस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर १ वर्षाचे कालावधीमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या १०० कारवाया केल्या आहेत. पुणे पोलिस आयुक्तालयाचे इतिहासामध्ये प्रथमच इतक्या कमी कालावधीमध्ये अशा स्वरुपाची प्रभावी कारवाई झाली आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे ३६० दिवसात मोक्काचे शतक!

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत १०५वी कारवाई…

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

राज्यात 17471 पोलिसांची होणार भरती…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!