
धक्कादायक! लहान मुलांचे खळण्यातील भांडण बेतले जीवावर…
कोल्हापूर : लहान मुलांचे खळण्यातील भांडण एका चिमुकल्याच्या जीवावल बेतले आहे. खेळण्याच्या रागातून 11 वर्षांच्या मुलीने साडे चार वर्षांच्या मुलाला नदीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे ही घटना घडली आहे. मल्लिकार्जुन बिसलसिदया पतंगी (वय साडेचार) या बालकाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या मल्लिकार्जुन यांचा कृष्णा नदीत शनिवारी मृतदेह सापडला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे हा संपूर्ण प्रकार घडकीस आणला आहे.
जयसिंगपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची चौकशी केली असून तिला बालन्यायलयात हजर करण्यात येणार आहे. कोथळी येथील नेमगोंडा पाटील यांच्या वीट भट्टीवर काम करणार्या लक्ष्मी पतंगी यांचा मुलगा मल्लिकार्जुन पतंगी हा शुक्रवारी दुपारी 3 वाजल्यापासून बेपत्ता होता. रात्री उशीरा जयसिंगपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. जयसिंगपूर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान शनिवारी दिवसभर पोलीस घटनास्थळी होते. वीटभट्टीजवळ असणार्या सीसीटीव्हीची मदत घेतली. 11 वर्षीय मुलीने मल्लिकार्जुनला कृष्णा नदीच्या पात्राकडे घेवून जात असल्याचे यामध्ये दिसले आणि पोलिसांचा संशय तिच्यावर गेला. पोलिसांना तपासादरम्यान त्या मुलीने मुलाला नदीत ढकलून दिल्याची माहिती पुढे आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! मुलीच्या नातेवाईकांनी केली वृद्ध वडिलांना बेदम मारहाण; जीव गेला…
लोणीकंद पोलिसांनी महिलेच्या हत्येचा तपास केला उघड; धक्कादायक माहिती समोर…
धक्कादायक! आरोपी निघाला पीडित युवतीचा सख्खा मावस भाऊ…
धक्कादायक! लग्नानंतर नवरीने पाचव्या दिवशीच दाखवला खरा चेहरा…
धक्कादायक! चुलत्याचे मुंडके दुचाकीवर ठेवून गावभर फिरत राहिला…

