
विवाहीत युवकावर तिघांनी शेतामध्ये केला सामुहिक बलात्कार…
लखनौ (उत्तर प्रदेश): राज्यातील संभलमध्ये एका विवाहित युवकावर गावातील तीन युवकांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवाय, त्यांनी संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दोघांचा शोध सुरू आहे.
रजपुरा पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. एक 24 वर्षीय युवक शेतात पहारा देण्यासाठी गेला होता. यावेळी गावातल्या तीन मुलांनी त्याला पकडून शेतात त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला. शिवाय, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या तिघांनीही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित युवकाने केला आहे. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याच्यावर अत्याचार करून ते तिघेही पळून गेले, असं पीडित युवकाने सांगितले.
दरम्यान, या कृत्याने पीडित मुलगा प्रचंड घाबरला होता. आरोपींच्या धमकीमुळे तो एक दिवस उलटूनही घरी पोहोचला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला; पण तो सापडला नाही. अखेर, मुलगा मिळाल्यानंतर माहिती पुढे आली. कुटुंबियांनी उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असून, गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…
विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अखेर अटकेत…
बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…
सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार; तक्रार दाखल…
युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…

