
पिंपरी-चिंचवड हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपींना भोसरी पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड हद्दीत गांजा विक्री साठी आलेल्या आरोपींना एम. आय. डी. सी भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाने जेरबंद केले आहे. आरोपींकडून ५ किलो ९९० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकातील पोलिस अंमलदार प्रविण मुळुक व भागवत शेप यांना २८/१२/२०२३ रोजी एम. आय. डी. सी भोसरी पोलिस स्टेशन हद्दीत एक जण वैशाली स्विट जवळ बोऱ्हाडे वाडी मोशी पुणे या ठिकाणी गांजा विक्री साठी येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली होती. एम. आय. डी. सी भोसरी पोलिस स्टेशन कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे सदर ठिकाणी सापळा रचला. के. टी. एम. गाडीवरुन काळ्या रंगाची बॅगमध्ये गांजा हा अंमली पदार्थ घेवुन विक्री करता आला असता त्यास शिताफीने पकडले. मलीकजान शब्बीर बलगानूर (वय २४ वर्षे, रा. पुष्पाई हौसिंग सोसायटी, बिल्डीग नं. ए/ २६, रुम नं. ४०१, बाबासाहेब आंबेडकर वसाहत, सेक्टर नं. २२, निगडी पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या कडून ०२,९९,५००/- रुपये किंमतीचा एकुण ५ किलो ९९० ग्रॅम वजनाचा गांजा व ०१,२०,०००/- रुपये किंमतीची के. टीएम. डयुक मो. सा. नं. एम. एच. १४ जे. डब्ल्यु ७८६० असा एकुण ०४,१९,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीस सदर गुन्हयात अटक करुन त्याची पोलिस कोठडी घेवुन त्याचा साथीदार गुनानिधी रतन साह (वय २९ वर्षे, गुलाबराव काळभोर चाळ नं. ३, रुम नं. ५ काळभोर नगर चिंचवड, पुणे मुळ पटुका साईपल्ली, बिजेपुर राज्य ओडीसा) याचा शोध घेवुन त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी पोलिस उपायुक्त संदिप डोईफोडे परि-०३, सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक मुगळीकर यांचे मार्गदर्शना खाली राजेंद्र निकाळजे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एम. आय. डी. सी भोसरी पोलिस स्टेशन, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. पांचाळ, पोलिस उप निरीक्षक आर. बी. पानसरे पोलिस अंमलदार चंद्रकांत गवारी, शरद गांधिले, संजय जरे, गणेश बोऱ्हाडे, राहुल लोखंडे, प्रविण मुळुक, भागवत शेप, अनिल जोशी, नितिन खेसे, विशाल काळे, अक्षय क्षिरसागर यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास एस. एस. पांचाळ सहा. पोलिस निरीक्षक एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन हे करत आहेत.

भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी…
भोसरी पोलिसांकडून सराईत गुन्हेगार ४८ तासात जेरबंद…
पिंपरी-चिंचवडमध्ये युनिट-४ कडून १४ गुन्हे उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
पिंपरी-चिंचवडमध्ये पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीचे कारनामे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

