
पुणे जिल्ह्यात थर्टी फर्स्टच्या पार्टीदरम्यान युवकाने गमावला जीव…
पुणे : थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेल्या एका युवकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मयूर भाटी (वय ३०, रा. शिक्षक कॉलनी वराळे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मयूर हा आपल्या मित्रांसमवेत वराळे इंद्रायणी नदी काठी थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी आला होता. यावेळी मयूर पाण्यात पोहोण्यासाठी उतरला. पण, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बु़डून मृत्यू झाला. सोबत आलेल्या मित्रांना मयूर बुडाल्याचे समजताच त्यांनी मदतीसाठी स्थानिक ग्रामस्थांना बोलावले. मात्र, तोपर्यंत खूप उशिर झाला होता. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयूरचा मृतदेह नदीबाहेर काढला.
दरम्यान, मयूरचा मृत्यू झाल्यानंतर मित्रांना मोठा धक्का बसला. कुटुंबियांवरही शोककळा पसरली आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी निघालेल्या सहा मित्रांचा अपघाती मृत्यू…
पुणे शहरात पोलिसांसमोरच कोयता गँगने युवकांवर केला हल्ला…
पुणे जिल्हा हादरला! विवाहितेचे हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं…
पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…
पुणे शहरात युवकाचा लाथा बुक्क्यांनी मारहाण करून खून…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

