
येरवडा कारागृहात कैद्याचा निर्घृण खून; कसा केला पाहा…
पुणे : पुणे शहरातील येरवडा कारागृहात कैद्याचा कात्री आणि दरवाजाच्या बिजागिरीने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महेश महादेव चंदनशिवे असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चौघा बंद्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येरवडा कारागृहात भरदिवसा कैद्याची हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी (ता. २८) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हत्येच्या घटनेने येरवडा कारागृह हादरले आहे. पूर्व वैमनस्यातून 4 कैद्यांनी महेश चंदनशिवे याची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. कैचीने आणि दरवाज्याच्या बिजागिरीने मानेवर वार करत कैद्याची निर्घृण हत्या करण्यात आली.
अनिकेत समदूर, महेश तुकाराम माने, गणेश हनुमंत मोटे आणि आदित्य संभाजी मुरे अशी या संशयित आरोपींची नावे आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, तोडफोड करणे, दुखापत करणे, घातक शस्त्र, अग्नीशस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, दरोडा घालणे, चोरी अशा आरोपांखाली महेश हा येरवडा कारागृहात होता. दरम्यान, इतर चौघे संशयित देखील विविध गुन्ह्यांमध्ये कारागृहात होते. पण पूर्ववैमानस्य मनात ठेवून या चौघांनी कारागृहात महेशची हत्या केली.
महेश चंदनशिवे याच्यावर पिंपरी, चिखली आणि भोसरी या पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2013 ते 2022 या कालावधीत एकूण 12 गुन्ह्यांअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरोड्याची तयारी करून अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात महेश चंदनशिवे हा 30 नोव्हेंबर 2022 पासून येरवडा कारागृहात होता.
महेश चंदनशिवे याच्यावर हत्या केलेल्यापैकी गणेश मोटे हा एका गुन्हेगारी टोळाची मोहरक्या आहे. याच टोळीचा महेश माने हा सदस्य असल्याची माहिती देण्यात आली आहे. मोटे आणि माने हे दोघेही सांगवी येथील योगेश जगताप खून प्रकरणातील संशयित आरोपी आहेत. त्याप्रमाणे फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. मोक्कातर्गत ते कारागृहात आहेत. अनिकेत समदूर हा पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2022 मध्ये झालेल्या एका खून प्रकरणात तो वर्षभरापासून कारागृहात होता.

येरवडा कारागृहातून पळालेला कैदी स्वतःहून कारागृहात दाखल…
ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्याचा ससूनमध्ये मृत्यू…
कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या…
येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

