राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): अभिनेता गोविंदा याने राजाबाबू चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकेप्रमाणे एका लखोबा लोखंडे याने सहा महिलांना फसवून त्यांच्याशी विवाह केला होता. पण, ओडिशा पोलिसांनी वेश बदलून इतरांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.

संबंधित व्यक्ती कधी न्यूरोसर्जन, डॉक्टर तर कधी पंतप्रधान कार्यालयातला अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करत होती. काश्मीरमधल्या कुपवाडा येथून या व्यक्तीला ओडिशा पोलिसांनी अटक केली आहे. सय्यद इशान बुखारी उर्फ इशान बुखारी उर्फ डॉ. इशान बुखारी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने ओडिशाच्या जयपूर जिल्ह्यातल्या नेउलपूर गावातून अटक केली. एसटीएफचे महानिरीक्षक जे. एन.पंकज म्हणाले, ‘अनेक बनावट नावं धारण केलेल्या या व्यक्तीचे पाकिस्तानमधल्या अनेकांशी आणि केरळातल्या काही संशयित घटकांशी संबंध होते; पण पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिन्स अर्थात आयएसआयशी त्याचा संबंध असल्याचे आढळून आले नाही. काश्मीर पोलिस बुखारीच्या शोधात होते. फसवणुकीशी संबंधित अनेक प्रकरणांशी त्याचा संबंध होता. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट आधीच जारी करण्यात आले होते. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पंजाब, काश्मीर आणि ओडिशातली संयुक्त पथकं त्याची चौकशी करतील.

जे. एन. पंकज यांनी सांगितले, ‘बुखारी याने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, काश्मीरसह देशाच्या विविध भागांतल्या किमान सहा महिलांशी लग्न केले. तसंच त्याचे अनेक महिलांशी प्रेमसंबंध होते. तो अनेक वेबसाइट्स आणि अ‍ॅप्सवर सक्रिय होता. फसवणूक करण्यासाठी तो वेगवेगळी ओळख सांगत असे. आरोपीचे काही देशद्रोही घटकांशी संबंध होते. मात्र त्याची नेमकी भूमिका काय याचा सखोल तपास केला जाईल. आरोपीच्या विरोधात पुरेसे पुरावे आहेत. तो दहशतवादी कटात सामील असल्याबद्दल काहीही सांगणं खूप घाईचं आहे. परंतु, त्याचे पाकिस्तानशी काही संबंध होते आणि ते पडताळून पाहिले जाईल. तो पाकिस्तानी गुप्तहेर होता हे आम्ही नाकारू शकत नाही; पण आतापर्यंत आमच्याकडे फारसे पुरावे नाहीत. तथापि, आम्ही एनआयएच्या संपर्कात आहोत.’

न्यूरोसर्जन, लष्करात डॉक्टर किंवा पंतप्रधान कार्यालयात अधिकारी असल्याचे भासवण्यासाठी या व्यक्तीने बनावट कागदपत्रं तयार केली होती. त्याच्याकडे अमेरिकेतले आयव्ही लीग कॉलेज, कॉर्नेल युनिव्हर्सिटीचं वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र आहे. डॉक्टर म्हणून आपली ओळख पटवण्यासाठी या ठगाने कॅनेडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आणि तमिळनाडूतल्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र बनवले. फसवणूक करण्यासाठी, तसेच नवीन ओळख भासवण्यासाठी तो आंतरराष्ट्रीय पदवी, प्रतिज्ञापत्र, बाँड, एटीएम कार्ड, कोरे चेक्स, आधार कार्ड आणि व्हिजिटिंग कार्ड जवळ बाळगत असे. एसटीएफ पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून 100हून अधिक कागदपत्रे आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत केलं लग्न…

Video: दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा…

दोघांना सोडलं, तिसऱ्याची हत्या अन् चौथं लग्न करायला निघाली…

प्रेमप्रकरण! बिझनेस मिटींगसांगून प्रेयसीसोबत राहू लागला अन् पुढे…

दोन भावांचा एकाच महिलेवर जडले प्रेम अन् पुढे…

डॉक्टरने केला तीन युवतींवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!