
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम; घ्या जाणून…
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं वाहनांच्या PUC प्रमाणपत्रासंदर्भातील नियम बदलले आहेत. नव्या बीएस-6 खासगी वाहनांना वारंवार पीयूसी करावी लागणार नाही. जर तुमचे खासगी वाहन 6 वर्षापर्यंत जुनं असेल तर एकदा पीयूसी केल्यास ती 3 वर्षांपर्यंत चालेल. वाहनाचं वय वाढल्यानंतर पीयूसी नुतनीकरणाची कालमर्यादा कमी होत जाईल.
नव्या नियमांनुसार BS-VI मानकांच्या खासगी वाहनांच्या वयाच्या आधारावर पीयूसीची वैधता निश्चित केली जाणार आहे. जर तुमच्या वाहनाचं वय 6 पर्यंत जुनं असेल तर त्यावेळी काढलेले पीयूसी प्रमाणपत्र 3 वर्षापर्यंत वैध राहील. यानंतर 6 ते 10 वर्षापर्यंत वाहन जुनं असल्यास दरवर्षी पीयूसी प्रमाणपत्राचं नुतनीकरण करावे लागेल. वाहन 10 वर्षापेक्षा अधिक जुनं असल्यास दर 6 महिन्यानं पीयूसी प्रमाणपत्र काढून घ्यावे लागेल. जर तुमचे BS-VI खासगी वाहने 5 वर्ष जुनं असल्यास दर 6 महिन्यानं किंवा प्रत्येक वर्षी पीयूसी प्रमाणपत्र काढावं लागणार नाही. एकदा काढलेलं प्रमाणपत्र 3 वर्ष मान्य असेल.
View this post on Instagram
सरकारने BS-VI कर्मशिअल म्हणजेच ट्रान्सपोर्ट वाहनासाठी वेगवेगळी कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हे बदल कर्मशिअल वाहनांच्या वाहनचालकांना माहिती असणं आवश्यक आहे. जर तुमचं वाहन 6 वर्षापर्यंत जुनं असेल तर पीयूसी प्रमाणपत्र 2 वर्षापर्यंत वैध राहील. वाहन 6 ते 10 वर्ष जुनं असल्यास पीयूसीचं दरवर्षी नुतनीकरण करावं लागेल. 10 वर्षांपेक्षा वाहन जुनं असल्यास पीयूसी 6 महिन्यात करावं लागेल.
13 नोव्हेंबर 2026 रोजी मंत्रालयानं या नियमांची अधिसूचना जारी केली होती. 19 नोव्हेंबर 2026 ला हे सरकारी राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर लागू झाले आहेत. बीएस-VI च्या खासगी वाहनांसाठी 6 ते 10 वर्ष वाहनांसाठी दरवर्षी पीयूसी करावी लागेल. 10 वर्षांपेक्षा अधिक वाहनांसाठी दर 6 महिन्यांनी पीयूसी करावी लागेल. कमर्शिअल बीएस-6 वाहनांसाठी 6 वर्षापर्यंत 2 वर्षांनी पीयूसी करावी लागेल. त्यानंतर 6 ते 10 या कालावधीत दरवर्षी पीयूसी करावी लागेल. 10 वर्षानंतर प्रत्येक 6 महिन्यांनंतर पीयूसी करावी लागेल. जुन्या बीएस-1, 2, 3 वाहनांना 3 महिने आणि बीएस-4 वाहनांसाठी 6 महिन्यांनी पीयूसी करावी लागेल.
नाशिक! निवृत्त RTO अधिकाऱ्याची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या…
HSRP नंबर प्लेट नसल्यास परिवहन विभाग करणार मोठी कारवाई…
पुणेकरांच्या गाड्यांना आता ‘तीन अक्षरी’ नंबरप्लेट! MH-12 ऐवजी…
FASTag बाबत मोठा निर्णय; पाहा नवे नियम कधीपासून लागू…
वाहनाच्या Number Plate वरून कशी मिळवाल मालकाची माहिती…

