वाल्मिक कराडच्या मुलावर महिलेचे गंभीर आरोप; मुलीला उचलून बेडवर फेकलं, आमच्यापेक्षा मोठा…

बीड : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्यावर सोलापूरात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या इतर दोन साथीदारांना देखील सहआरोपी करण्यात आलं आहे. पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवणे, मारहाण करणे, ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा कपडे फाडून विनयभंग करणे, तसेच जमिनीचे प्लॉट, गाड्या आणि दागिने बळकावल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. सुशील कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार असे गुन्हा दाखल झालेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पीडित महिला ही सोलापूरची रहिवासी असून ती आपले पती, दोन मुलं, सासू, दीर, जाऊ आणि त्यांच्या दोन मुलांसह वास्तव्याला आहे. पीडित महिलेचे पती सुशील वाल्मिक कराड याच्याकडे मार्केटिंग मॅनेजर आणि कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होते. तसेच, पीडित महिला ‘आराध्या ट्रान्सपोर्ट’ नावाने स्वतःचा स्वतंत्र ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होती. महिलेने बँकेतून कर्ज काढून दोन बलकर ट्रक, दोन स्विफ्ट गाड्या, दोन दुचाकी खरेदी केल्या होत्या. तर परळी वैजनाथ येथील जलालपूरमध्ये ३० लाख रुपये किमतीचा प्लॉटही खरेदी केला होता. मात्र, आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची ही प्रगती आणि भरभराटी पाहून आरोपी सुशील कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांना त्याचा मत्सर वाटू लागला. “तू आमच्यापेक्षा मोठा झालास, तुझा हा ट्रान्सपोर्ट धंदा बंद कर आणि हे सर्व आमच्या नावावर कर,” अशी धमकी देत त्यांनी या कुटुंबाचा छळ सुरू केला.

मे २०२४ मध्ये छळाला सुरुवात झाली. आरोपींनी पीडित महिलेच्या पतीला ‘सान्वी ट्रेडर्स’च्या ऑफिसमध्ये डांबून ठेवून लाकडाने बेदम मारहाण केली आणि डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून जीवे मारण्याची धमकी दिली. त्या रात्रीच गोपी गंजेवार याने बळजबरीने त्यांच्या दोन बलकर ट्रक्स, दोन चारचाकी आणि दोन दुचाकी गाड्यांच्या चाव्या आणि कागदपत्रे हिसकावून घेतली. यानंतर ७ मे २०२४ रोजी सकाळी आरोपी सुशील कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार हे पीडितेच्या घरात घुसले. त्यांनी संपूर्ण कुटुंबासमोर पतीला बेदम मारहाण केली. आपल्या वडिलांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांची ९ वर्षांची मुलगी मध्ये पडली. यावेळी सुशील कराड याने तिच्या डोक्यालाही रिव्हॉल्व्हर लावली, तिला जोरात ढकलून तिचे कपडे फाडले आणि तिला बेडवर फेकून दिलं, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित कुटुंबाला परळी येथील रजिस्टार कार्यालयात नेऊन बंदुकीचा धाक दाखवून त्यांचा ३० लाखांचा प्लॉट अनिल मुंडे याच्या नावावर बळजबरीने खरेदी करून घेतला. एवढेच नव्हे तर, १७ मे रोजी घरात घुसून सोन्याची अंगठी हिसकावून ती दुकानात विकायला लावून १ लाख ३३ हजार रुपये रोख रक्कम लाटली.

दरम्यान, हा सगळा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेचं कुटुंब सुशील कराडच्या वडिलांना अर्थात वाल्मिक कराडला भेटायला बीडला गेले. तिथे वाल्मीक कराडने पीडित कुटुंबाला धीर दिला. तुमची वाहनं, सोन्याची अंगठी आणि जमीन परत करायला लावतो. तुमच्या पतीचं कानाचं ऑपरेशन करू घ्या, असं बोलून घरी पाठवलं. तसेच दोन आठवड्यात भेटायला येण्यास सांगितलं. त्यानुसार कुटुंबीय पुन्हा वाल्मीक कराडला भेटायला आले. पण त्यांची भेट झाली नाही. दोन वेळा असंच घडलं. पण याची कुणकुण आरोपींना लागल्यानंतर १५ जून २०२४ रोजी गोपी गंजेवार पाच ते सहा साथीदारांसह महिलेच्या घरात घुसला. ‘वाल्मीक आण्णाला पुन्हा भेटलीस, घटनेबद्दल कुणाला काही सांगितलं तर तुझ्या कुटुंबाला खल्लास करतो’ अशी धमकी दिली.

या धमकीमुळे कुटुंब घाबरलं होतं. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची तक्रार घेण्यात आली नसल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. यानंतर त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. आता अखेर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संतोष देशमुख प्रकरणी वाल्मीक कराड आधीच तुरुंगात असताना आता मुलगा सुशीलवर देखील गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा दणका अन् मुलाचा फेसबुकवर इशारा…

संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप निश्चित…

वाल्मिक कराडचा राइट हँडचं अघोरी कृत्य; राम नाम सत्य है…

बीड! वाल्मिक कराड असलेल्या कारागृहात पुन्हा एक कांड…

बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!