लग्नानंतर दोन दिवसांतच माहेरी जाण्याचा हट्ट अन् बळावला संशय…

बीड : लग्न जुळवण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात उघडकीस आला आहे. लग्नासाठी अडीच लाख रुपये खर्च केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत नववधूने माहेरी जाण्याचा हट्ट धरला. त्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. संबंधित तरुणी अल्पवयीन असल्याचे तपासात समोर आले. मध्यस्थांनी लग्नाच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई येथे राहणाऱ्या एका तरुणाच्या लग्नासाठी जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील काही मध्यस्थांनी त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला. २२ जून रोजी व्हॉट्सॲपवर मुलीचा फोटो आणि बायोडाटा पाठवण्यात आला. त्यानंतर मुलगी पाहण्यासाठी तरुणाच्या कुटुंबीयांना जाफ्राबाद येथील जाहिद मशिदीजवळ बोलावण्यात आले. १ ऑक्टोबर रोजी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुलीला वडील नसल्याचे सांगत लग्नासाठी अडीच लाख रुपये खर्च येईल, अशी अट मध्यस्थांनी घातल्याचे सांगण्यात येते. मुलाच्या कुटुंबाने लग्नाची आशा धरून पैशांची जुळवाजुळव सुरू केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

युवकाची आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या या कुटुंबाने लग्नासाठी पैसे उभे करण्याकरिता ऊसतोड मुकादमाकडून आगामी २०२६-२७ हंगामाची आगाऊ रक्कम घेतली. कष्टाच्या पैशांतून आणि आगामी हंगामाच्या उचलीतून लग्नासाठी आवश्यक रक्कम जमा करण्यात आली. ५ ऑक्टोबर रोजी ठरल्याप्रमाणे मध्यस्थ कारने गेवराई येथे आले. लग्नाच्या व्यवहारापोटी दोन वेगवेगळ्या फोन-पे खात्यांवर प्रत्येकी २५ हजार रुपये पाठवण्यात आले, तर उर्वरित दोन लाख रुपये रोख दिल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर विवाहविधी पार पडला. लग्न झाल्यामुळे कुटुंबीयांना दिलासा मिळाला होता. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही.

लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत नववधूने माहेरी जाण्याचा आग्रह धरल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर त्यांनी मध्यस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप आहे. या प्रकारामागे आर्थिक फसवणुकीचा कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. लग्नासाठी दिलेली रक्कम आणि सोन्याचे दागिने हडप करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवण्यात आल्याचा आरोप असून, या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे.

कागदपत्रांत वय २० वर्षे; प्रत्यक्षात मुलगी अल्पवयीन
या प्रकरणात १९ ऑक्टोबर रोजी संबंधित तरुणीने पोलिसांसमोर जबाब दिल्यानंतर महत्त्वाची माहिती समोर आली. कागदपत्रांमध्ये तिचे वय २० वर्षे दाखवण्यात आले होते. त्यासाठी नवीन आधार कार्ड तयार करण्यात आल्याचेही समोर आल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात ती अल्पवयीन असल्याचे तपासात उघड झाले. आपल्याला बळजबरीने गेवराई येथे आणून लग्न लावण्यात आले आणि मध्यस्थांनी आपलीही फसवणूक केली, असे तरुणीने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

दरम्यान, या प्रकरणी गेवराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संबंधित अल्पवयीन मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर तिला सुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती आहे. लग्न जुळवण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक, वयाबाबत चुकीची कागदपत्रे तयार करणे आणि अल्पवयीन मुलीच्या विवाहाशी संबंधित बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणातील मध्यस्थांची भूमिका, पैशांचा व्यवहार आणि कथित रॅकेटमागील सूत्रधार कोण आहेत, याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ…

लग्नानंतर महिन्याच्या आतच नवरदेवाचा खून, नवरीसह तिच्या आईचे एकासोबतच प्रेमसंबंध…

प्रेम! नवरदेवाचा बाप पडला नवरीच्या आईच्या प्रेमात अन्…

‘लुटेरी दुल्हन’ अखेर सापडली! तब्बल २५ लग्न, दिवसातून ३ वेळा अंघोळ अन्…

एक-दोन नव्हे तर ५० पेक्षा जास्त जणांसोबत महिलेने केले लग्न…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!