नाशिक! प्राध्यापिकेचे अश्लील व्हिडिओ विद्यार्थ्याने केले स्क्रीन रेकॉर्ड अन्…

नाशिक: एका प्रसिद्ध महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित माजी विद्यार्थ्याविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन ओढे (राठोड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित चेतन याने पीडित प्राध्यापिकेला आधी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विश्वास संपादन केल्यानंतर दोघंही सतत व्हिडीओ कॉलवर बोलत असत. मात्र आरोपीने याचा गैरफायदा घेतला. व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आरोपीने प्राध्यापिकेचे अश्लील व्हिडिओ तयार केले. संबंधित व्हिडिओ आणि खाजगी चॅट्स सोशल मीडियावर तसेच नातेवाईकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने प्राध्यापिकेकडे ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

शिवाय, पीडित प्राध्यापिकेवर महाराष्ट्राबाहेर फिरायला सोबत येण्यासाठी सतत दबाव टाकत होता. प्राध्यापिकेने या सर्व गोष्टींना स्पष्ट नकार दिल्यानंतर, आरोपीने तिच्या संपूर्ण कुटुंबाला समाजात बदनाम करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित प्राध्यापिकेने गंगापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पीडित प्राध्यापिका ही अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील असल्याने, पोलिसांनी संशयित चेतन ओढे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गंगापूर पोलिसांनी तातडीने आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. तसेच संशयिताचे मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त करण्यात आले असून, सायबर फॉरेन्सिक टीमद्वारे या तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलिस करत आहेत.

नाशिक! डॉ. मनीषा जेजूरकर प्रकरणात नवा ट्विस्ट; दाजीचं वागणं खूप बदललं…

नाशिक! प्रेमात मला फसवले, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्…

नाशिक! विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, रिसॉर्टवर प्रियकराने घेतला जीव…

नाशिक! वैष्णवी आवारे हत्येचा उलगडा; प्रियकराला दुसऱ्यासोबत लग्न जमल्याचा राग…

नाशिकमध्ये महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह; अनैतिक प्रेमसंबंधातून संपवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!