
भंडारा हादरलं! तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार…
भंडारा : भंडारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डात एका चिमुकलीला (वय ३) आमिष दाखवून एका नराधमाने सार्वजनिक शौचालयात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना गुरुवारी (ता. ६) सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण भंडारा शहरात तीव्र संतापाची लाट पसरली असून, घटनेच्या निषेधार्थ आज ‘भंडारा बंद’ची हाक देण्यात आली आहे.
रोहित वासनिक (वय 30) असे या आरोपीचे नाव असून तो अविवाहित आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित याने चिमुकलीला शौचालयात नेऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बालिकेने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांच्या ही बाब तात्काळ लक्षात आली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून आरोपी रोहित याला जागेवरच पकडले आणि संतप्त जमावाने त्याला चोप दिला. जमावाच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात आरोपीने स्वतःला टाइल्सच्या तुकड्याने मारहाण करून जखमी करून घेतले.
View this post on Instagram
घटनेनंतर पीडित बालिका आणि जखमी आरोपी या दोघांनाही उपचारासाठी भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. जवळपास 7 तास मेडिकल कॉलेज परिसरात अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भंडारा शहरासह पोलीस मुख्यालय, राखीव पोलीस दल आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतून अतिरिक्त पोलीस कुमक तातडीने तैनात करण्यात आली. आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आणि त्याला कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास नागरिकांचा रोष शांत झाला.
दरम्यान, या दुर्दैवी प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, तसेच आरोपीचे वकीलपत्र कोणत्याही वकिलाने घेऊ नये, या मागणीसाठी आज भंडारा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठ आणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
महाराष्ट्र दिनी पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर ठेचून केली हत्या…
पुणे! आळंदीत चिमुकली आणि वृद्ध महिलेची निर्घृण हत्या…
महाराष्ट्र हादरला! चिमुकलीवर अत्याचार करून डोकं ठेचलं; मृतदेह पाहून आक्रोश…
चिमुकलीवर बलात्कार करुन हत्या करणाऱ्या आरोपीने दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी…
चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीचे पीएसआय अन्नपूर्णा यांनी केले एन्काऊंटर…

