पुणे! कात्रज बोगद्याजवळ रक्तरंजित थरार; बापाच्या हत्येचा 24 वर्षांनी घेतला बदला…

पुणे : पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या जुन्या कात्रज बोगद्याजवळील परिसरात घडलेल्या एका हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका मुलाने तब्बल 24 वर्षांनंतर अत्यंत नियोजन पद्धतीने कट रचून मुख्य आरोपीचा काट काढला, असे तपासात समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणात मुख्य आरोपीसह त्याच्या तीन साथीदारांनाही अटक केली आहे.

संजय बाबूराव कडू-देशमुख (वय 40) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी मंथन दिशेन वैद्य, सौरभ सागर परदेशी, मिझान गौसउद्दीन शेख आणि संदीप बाबुलाल कोरी या चार जणांना अटक केली आहे. आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

जुन्या कात्रज बोगद्याजवळील असलेल्या शिंदेवाडी या परिसरात 11 जुलै रोजी संजय देशमुख यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला करुन त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आणि आरोपींना अटक करण्यात आली. संजय देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या एका माहितीनुसार आरोपींना जेव्हा ताब्यात घेतले आणि त्याची विचारपूस केली. तेव्हा केलेल्या चौकशीत मुख्य आरोपी मंथन वैद्य याने हत्येची कबुली दिली. आरोपीने सांगितले की, मंथन याच्या वडिलांची म्हणजे दिनेश वैद्य यांची हत्या 2003 मध्ये सध्या हत्या करण्यात आलेल्या (संजय देशमुख) याने हत्या केली होती. त्या वेळी मंथन अतिशय लहान होता. तेव्हाच वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची भावना त्याच्या मनात होती.

दरम्यान, मंथन याने 24 वर्षानंतर आपल्या मित्रांच्या मदतीने सापळा रचत संजय देशमुख याची हत्या केली. राजगड पोलिस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 72 तासांत उलगडा केला आहे. या धाडसी कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.

पुणे! व्हॉट्सॲपवरून सुरू होता हायप्रोफाईल सेक्स रॅकेट; पोलिसांनी केला पर्दाफाश…

पुणे पोलिसांनी शिकवला वारकऱ्यांच्या वेशातील चोरट्यांना धडा…

पुणे! घायवळ टोळीकडून कोयत्याने वार, हल्ल्याचा सूत्रधाराला मुंबईतून केली अटक…

पुणे! सियाची लाय डिटेक्टर टेस्ट नाकारली; जामिनाचा मार्ग मोकळा…

पुणे जिल्ह्यात युवतीला ढकललं कालव्यात अन् 18 तासांनंतर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!