
हृदयद्रावक! माहेरी जाताना नववधूचा भीषण अपघातात मृत्यू…
जळगाव : लग्नानंतर माहेरी जाण्यासाठी काकांसोबत दुचाकीवरून निघालेल्या नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील (वय २१) यांचा कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठासमोरील रस्त्यावर भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला तर त्यांचे काका रावसाहेब पाटील गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वैशाली पाटील यांचा विवाह 7 जुलै रोजी जळगावातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील देवराम नगर येथे वास्तव्यास असलेले पोलिस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदाम्पत्य देवदर्शनासाठी गेले होते आणि काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते. देवदर्शन करून नुकतेच घरी परतलेल्या वैशाली सोमवारी (13 जुलै) माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, नियतीने त्यांच्यावर घाला घातला. नव्या आयुष्याची सुरुवात झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांतच घडलेल्या या दुर्घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.
वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी त्यांचे काका प्रवीण सूर्याजी पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) सोमवारी जळगाव येथे आले होते. दुपारचे जेवण आटोपल्यानंतर दोघेही दुचाकीवरून कोळपिंप्रीकडे निघाले. दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास ते विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या गंभीर दुखापतीमुळे वैशाली पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत त्यांचे काका प्रवीण पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नाच्या आनंदाचे वातावरण काही दिवसांतच शोकात बदलल्याने या घटनेची सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अपघातास कारणीभूत चारचाकी वाहनाचा शोध सुरू केला आहे. नवविवाहितेच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
View this post on Instagram
नवविवाहित युवतीचा मृत्यूने उडाली खळबळ; मृत्यूच्या ३ तास आधी…
हृदयद्रावक! घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावून छळ; नवविवाहितेची आत्महत्या…
हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी…
हृदयद्रावक! एक नवविवाहित तर दुसऱ्या बहिणाचा विवाहापूर्वी अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! नवविवाहित मयुरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला गळफास…

