पुणे पोलिसांनी 70 कॅमेरे तपासले अन् चिमुकलीची केली सुटका; पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव…

पुणे: पुणे शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या चिमुकलीची पुणे पोलिसांनी सुखरूप सुटका केली. बंडगार्डन पोलिसांनी सलग 12 तासांपेक्षा अधिक काळ 70 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर दोन महिला आणि एका पुरुषाला अटक केली. त्यांच्याकडून चिमुकलीला ताब्यात घेत आईकडे दिले. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मलठण येथील शिवानी अमोल भोसले (वय 21) या 30 मे रोजी पतीसोबत झालेल्या वादानंतर आपल्या एक वर्षाची मुलगी लीलासह पुणे रेल्वे स्थानक परिसरात आल्या होत्या. त्यांची राहण्याची कोणतीही सोय नसल्याने त्यांनी रेल्वे स्थानकातील आरक्षण कार्यालयाजवळील दत्त मंदिरासमोरील मोकळ्या जागेत रात्री मुक्काम केला. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिवानी यांना जाग आली असता त्यांची मुलगी जवळ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात मोठ्या प्रमाणात शोधाशोध केली. मात्र, मुलगी सापडली नाही. अखेर त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी तीन विशेष पथके तयार केली. पोलिसांनी रात्री 10 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत सलग 12 तास पुणे रेल्वे स्थानक परिसरातील 70 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासादरम्यान दोन महिला आणि एक पुरुष लहान मुलीला घेऊन जात असल्याचे दृश्य आढळून आले.

सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित तिघेही संशयित मुलीसह प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून सुटणाऱ्या पनवेल-नांदेड-पनवेल रेल्वेत बसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने दोन पथके रवाना केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत चौगुले यांच्या नेतृत्वाखालील पथक दौंड रेल्वे स्थानक परिसरात पोहोचले. 31 मे रोजी दुपारी संशयितांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. चौकशीदरम्यान संशयितांनी आपली नावे द्रुपदा लक्ष्मण गायकवाड (वय 35, रा. सुंदरनगर, जालना), राधा लकी आदिवासी (वय 20) आणि लकी संदीप आदिवासी (वय 21) अशी असल्याचे सांगितले. मुलीबाबत विचारणा केली असता त्यांनी पुणे रेल्वे स्थानकातून मुलीला उचलून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी चिमुकलीची सुखरूप सुटका करून तिला तिच्या आईच्या ताब्यात दिले.

पुणे हादरलं! प्रेयसीनंच फिल्मी स्टाईलने केलं प्रियकराचं अपहरण; कारण…

पुणे! भिगवण अपहरण प्रकरणात ट्विस्ट; ‘सदैव एकनिष्ठ’ स्टेटस ठेवणारा गजाआड…

पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…

Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!