मनोहर मामाचा आणखी एक कारनामा समोर, पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून उचललं…

सोलापूर : नव्याने उदयास आलेला भोंदूचा प्रकार सोलापूरच्या करमाळ्यातील आहे. व्यवसाय उद्योगात भरभराट आणायचे असेल तर पूजाअर्चा केली पाहिजे, असे सांगून भक्ताची फसवणूक केल्याचा प्रकार करमाळा येथे घडला आहे. मनोहर मामा भोसले असे या भोंदू बाबाचे नाव असून ज्याने स्वत:ची प्रतिमा प्रति बाळूमामा अशी केली आहे.

मनोहर मामा आणि त्याच्या सहकाऱ्याने एका भक्ताकडे दोन लाख रुपयाची मागणी केली होती. यामध्ये संबंधित भक्ताने 50 हजार रुपये मनोहर मामा भोसले आणि त्यांच्या साथीदाराकडे दिले. 50 हजार रुपये दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात मनोहर मामा भोसले आणि एकाविरोधात आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा, अंधश्रद्धा निर्मूलन गुन्हे अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या पथकाने मनोहर मामा भोसले याला पुणे जिल्ह्यातून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आर्थिक व्यवहार प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. प्रति बाळूमामा अशी प्रतिमा तयार केलेले मनोहर मामा याची कारकीर्द वादग्रस्त आहे. मनोहर मामा भोसले यांच्यावर सोलापूरसह पुणे व अन्य ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भोंदू राजेंद्र गडगे याच्याकडे निघाले 200 व्हिडीओ अन् 90 गोळ्या…

महाराष्ट्रील आणखी एका भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

महाराष्ट्रातील आणखी एका भोंदूचा महिलेसोबत किळसवाणा प्रकार…

महाराष्ट्रात आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड; महिलेवर अत्याचार…

अशोक खरात याचा युवतीवर 4 वेळा अत्याचार, सहाव्या गुन्ह्याबाबत धक्कादायक माहिती…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!