पहिल्या नवऱ्याने जीवन संपवलं; दोन मुलं, दुसरं लग्न केलं पण पेट्रोल पंपावर झाला भयंकर शेवट…

छत्रपती संभाजीनगर: करमाड येथे एका पेट्रोल पंपावर काम करून दोन मुलांसह आपली उपजीविका चालविणाऱ्या पूजा सुदाम गावंडे (वय २७, रा. चित्तेपिंपळगाव, करमाड) या महिलेची पेट्रोल पंपावर जाऊन धारदार चाकूने पूजा सुदाम गावंडेचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सत्यम रावसाहेब गावंडे (वय २८, रा. चित्तेपिंपळगाव) असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला घटनेनंतर दोन तासात अटक केली आहे.

पूजा गेल्या दीड महिन्यापासून ती आपल्या मुलांसाठी करमाड या पेट्रोल पंपावर नोकरी करत होती. ती गुरुवार सकाळी ९.३० वा. पेट्रोल पंपावर आली. पंपावर दुपारच्या सुमारास अचानक तिचा पती दुचाकीवरून पंपावर आला. पंपाच्या स्टॅडजवळ त्याने दुचाकी उभी करून पत्नी पूजाला पकडले. पूजाने त्याच्या हातातून सुटून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्यमने गाडीवरून उतरून मागून जाऊन तिला पकडले. पूजाचा गळा पकडून पाठीत चाकूने वार करून तिला जमिनीवर पाडले. यानंतर धारदार चाकूने गळा चिरला. आवाज ऐकून पेट्रोल पंपाच्या मालकाने सत्यमला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर तो घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाला.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पेट्रोल पंपावरील थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपी सत्यम पूजाची हत्या करण्यासाठी सकाळी पेट्रोलपंपावर आला होता. परंतु, पंपावर गर्दी असल्याने तो परत गेल्याची माहिती आहे. दुपारी पंपावर वाहनांची गर्दी नसताना तो पुन्हा आला आणि त्याने अत्यंत क्रुरतेने पत्नीला संपवले. या घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पूजाला दवाखान्यात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, पूजाचं पहिल लग्न चित्ते पिंपळगाव येथील सुदाम गावंडे यांच्यासोबत २०१७ मध्ये झाले होते. घरगुती कारणामुळे सुदाम यांनी १२ जानेवारी २०२३ रोजी आत्महत्या केली. त्यानंतर पूजाने १५ नोहेंबर २०२५ रोजी सत्यम रावसाहेब गावंडे सोबत देवाची आळंदी येथे आर्य समाज संस्थेत विवाह केला. पूजाला पहिल्या पतीपासून मुलगा व मुलगी आहे. लग्न झाल्यानंतर पूजा ही काही दिवस कुंभेफळ येथे राहत होती. परंतु, दीड महिन्यापूर्वी सत्यम याच्यासोबत काही वाद झाल्यामुळे ती करमाडला राहण्यासाठी आली होती.

सत्यम गवांडे याला दुसरे लग्न करायचे होते त्यासाठी तो पूजाकडे सोडचिठ्ठी देण्याचा तगादा लावत होता, मात्र पूजाने सोडचिट्टी देण्यास नकार दिला त्यातूनच त्याने पूजाचा गळा चिरून खून केला. त्यानंतर करमाड पोलिसांनी आरोपीला अवघ्या एका तासामध्ये ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर भर दिवस चिरला प्रेयसीचा गळा…

पुणे! प्रियकर पतीला मारत असताना पत्नीने मोबाईल सुरू केला अन्…

मैत्रिणीला रंग लावला म्हणून प्रियकराने मित्राला रेल्वे रुळांवर जिवंत बांधलं अन्…

नाशिक! पत्नी अन् प्रियकराने गोड बोलून संपवलं; अखेर गूढ समोर…

जळगाव! प्रियकराच्या मोबाईलमधील ‘अनसेंड’ मेसेजने उडवला थरकाप…

मैत्रिणीने लग्नाची पत्रिका अ्न साडी दाखवताच प्रियकराने घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!