पुणे! आळंदीत चिमुकली आणि वृद्ध महिलेची निर्घृण हत्या…

पुणे : पुणे जिल्ह्यातील आळंदी जवळ असलेल्या केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी येथे एका सहा वर्षांच्या चिमुकलीची गळा आवळून, तर तिला सांभाळणाऱ्या वृद्ध महिलेची (वय ७९) डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 1) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता दत्तात्रय गवारी या कामासाठी रात्रपाळीला गेल्या होत्या. घरी त्यांची नात धनश्री सोनू दत्तात्रय केदारी (वय ६) आणि तिला सांभाळण्यासाठी शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७९) या दोघीच होत्या. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळला, तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून दोघांचीही हत्या केली.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

संगीता गवारी या आज (गुरुवार) सकाळी कामावरून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्यांनी आरडाओरडा केला, त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे आळंदी आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दुहेरी हत्याकांडामुळे आळंदी परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यासोबतच संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून, आरोपीचा लवकरात लवकर माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमागे चोरीचा हेतू होता की पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला, याचा सखोल तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील पत्नीची एसयूव्हीखाली चिरडून कर्नाटकात केली निर्घृणपणे हत्या…

पुणे जिल्ह्यातून बेपत्ता असलेल्या युवतीचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर…

पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…

पुणे जिल्ह्यात लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या पत्नीची हत्या…

पुणे जिल्ह्यातील प्राध्यापकाच्या चपला विहिरीच्या काठावर दिसल्या अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!