
पुणे! मंचर येथील युवक एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड) : पुणे ग्रामीण पोलिस प्रशासनाने आंबेगाव तालुक्यातील सराईत गुन्हेगार पवन थोरात याला महाराष्ट्र प्रतिबंधक (एम पी डी ए) कायद्याच्या अंतर्गत कारवाई करत स्थानबद्ध केले आहे. मंचर पोलिस स्टेशन हद्दीतील पवन सुधीर थोरात (वय २६, जुना चांडोली रोड रा.मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) याच्यावर कारवाई करण्यात केली आहे.
पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवरती कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहशत माजवणाऱ्या व वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या पवन थोरात वरती बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. पवन सुधीर थोरात याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे मारहाण करून दहशत निर्माण करणे महिलांची गैरवर्तन अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचवत असल्याचे निदर्शनासस आले.

मंचर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी संबंधित प्रस्ताव तयार करून त् वरिष्ठांना सादर केला होता. पोलिसां अधीक्षक ग्रामीण प्रस्ताव मान्य करून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे पाठवला असता जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध कागदपत्रे व पुरावा पाहून पवन थोरात यांला(एम पी डी ए )अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याला ताब्यात घेऊन अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात परवानगी करण्यात आली आहे.
संबंधित कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व मंचर पोलिस स्टेशनच्या पथकाने पार पाडली. सराईत व गंभीर गुन्हे असणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पुणे ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.
View this post on Instagram
भिगवणच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, प्रेमसंबंधाचा Video समोर…
पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…
पुणे जिल्ह्यात लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या पत्नीची हत्या…
पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाने घेतला जगाचा निरोप…

