
भिगवणच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट, प्रेमसंबंधाचा Video समोर…
पुणे : दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोलीमधील युवतीचे भिगवण पोलिस स्टेशनच्या हद्दीत अपहरण झाल्याची घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. संबंधित युवतीने एक व्हिडीओ करून माझे अपहरण झाले नसल्याची माहिती दिली आहे. ज्या तरूणावर माझ्या अपहरणाचा आरोप होतोय त्याच्यासोबत माझे प्रेमसंबध असल्याची कबुली युवतीने कॅमेऱ्यासमोर येत दिली आहे. माझ्या अपहरणाच्या बातम्या खोट्या असल्याचे देखील तिने स्पष्ट केले आहे.
युवती तिच्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी जहीर शेख आणि अयान शेख या दोन आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली आणि युवतीच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट टाकून अपहरण केले. या घटनेनंतर भिगवण पोलिस ठाण्यासमोर हिंदू संघटनांची घोषणाबाजी केली. हिंदू संघटनांनी पुणे-सोलापूर मार्ग अडवून महामार्गावर टायर पेटवले. या आरोपींना पकडण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.

माझे आणि मुलाचे गेल्या काही वर्षापासून प्रेमसंबंध आहे. माझे अपहरण झाल्याच्या बातम्या आहेत. परंतु माझे कुणीही अपहरण केले नाही. माझ्या डोळ्यात चटणी वगैरे टाकलेली नाही. मी माझ्या मर्जीने घरातून निघून आले आहे. राजकीय पुढाऱ्यांनी तसे आरोप केले. परंतु मी माझ्या मर्जीनेच मुलासोबत आलेली आहे, असे भिगवण प्रकरणातील युवतीने स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील काही हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुणे-सोलापूर रस्ता येथे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भिगवण पोलिस स्टेशनसमोरही मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाले होते. घोषणाबाजी करत आरोपींना तत्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून, सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिसरात कोणताही धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कडक इशारा दिला आहे. “कोणीही अफवा पसरवू नये किंवा मोर्चे काढू नयेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भिगवणमधील युवतीच्या अपहरण प्रकरणात आला नवा ट्विस्ट…
पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…
पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…
Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…
पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…

