
सातारा! प्रेयसीने प्रेम संबधातून केला प्रियकराचा खून; कुऱ्हाडीने वार…
सांगली: कराड शहरातील आगाशिवनगर येथे एका व्यक्तीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेस पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
कराडच्या आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून महिलेने कुऱ्हाडीने वार करून प्रियकराचा खून केल्याची घटना आज सकाळी घडली. प्रियकर संशय घेत असल्याने प्रेयसीने खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेतील आरोपी महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेंद्र मरीआप्पा काळे (वय 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सारिका चंद्रकांत कोळी असे ताब्यात घेतलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत पतीने मारहाण केल्यामुळे जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. स्वाती गणेश हुबाळे (रा. कोल्हापूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून मारहाणीचा प्रकार आठवड्यापूर्वी झाला आहे. महिलेच्या नातेवाईकांनी पतीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. अखेर लक्ष्मीपुरी पोलिसांनी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. गणेश शंकर हुबाळे असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पुणे! युवकाने प्रेमसंबंधातून संपवलं आयुष्य, दोन बहिणींवर गुन्हा…
Valentine Day ला शिक्षकाने विद्यार्थिनीला बाहेर बोलवलं अन्…
इन्स्टाग्रामवरील प्रेम! महाराष्ट्राची लेकीच्या लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट…
पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…

