पुणे शहरात रात्री 12 ते पहाटे 3 दरम्यान काय घडलं; पोलिसांचा प्रचंड फौजफाटा…

पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी युवतीवर कारवाई न करणाऱ्या फरासखाना पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. बांगलादेशी युवतीबाबतची माहिती मिळाल्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली नाही. तसेच तिच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप ठेवत या महिला कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले होते.

या घटनेनंतर पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ अशा घटना थांबल्या पाहिजेत, यासाठी बुधवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे ठरवले. यानुसार, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध युनिटचे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रात्री 12 वाजता मोठा फौजफाटा बुधवार पेठेत दाखल झाला. बुधवार पेठेत येणारे आणि जाणारे सर्व रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली. शुक्रवार पेठ पोलिस चौकी जवळ असलेल्या सर्व कुंटणखान्यातील महिलांची महिला पोलिसांनी चौकशी केली. तसेच या ठिकाणी वावरत असलेल्या अनेक युवकांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. अमली पदार्थ तसेच जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करायला भाग पाडणे, बांगलादेशी महिलांचे बेकायदा वास्तव्य या अनुषंगाने पोलिसांनी अनेक संशयितांची चौकशी केली.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

यावेळी कुंटणखान्यातील मुलींची कसून चौकशी करण्यात आली. या कारवाईदरम्यान कुंटणखान्यातील 50 घरांची झडती घेण्यात आली. अमली पदार्थांसह, जबरदस्तीने अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात आहे का, याचा शोध या ऑपरेशनमध्ये घेण्यात आला. रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. यावेळी बुधवार पेठेच्या प्रत्येक गल्लीबाहेर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या मोहिमेत गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि सुमारे १५० हून अधिक पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

दरम्यान, धनकवडी परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलिसांनी छापा टाकून मालकासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत हुक्का पॉट, चिलीम आणि विविध फ्लेवर्स असा 12 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. श्री गुरुनानक कृपा इमारतीच्या टेरेसवर हा प्रकार सुरू असल्याचे उघड झाले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरात अवैध हुक्का पार्लरवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. वारजे माळेवाडी परिसरातही पोलिसांकडून एक कारवाई करण्यात आली. याठिकाणी पोलिसांनी 15 बुलेट सायलेन्सरवर कारवाई केली. वारजे भागातील कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांच्या सायलेन्सरची पोलिसांनी विल्हेवाट लावली. त्याचबरोबर ज्या गॅरेजवाल्याने असे सायलेनसर बसवले होते त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

HSRP नंबरप्लेट नसणाऱ्यांवर होणार कारवाई; पाहा किती दंड भरावा लागेल…

पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आंध्र प्रदेशातून निलंबित पोलिसाला केली अटक…

पुणे! माझ्या पत्नी आणि मुलीसोबत आयुष्य जगायचं होतं; मन हेलावणारी व्यथा…

पुणे! कार कोसळली नाल्यात अन् लष्करी अधिकाऱ्यामुळे वाचला चालकाचा जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!