युवतीच्या तळहातावरील मेसेज वाचून पोलिसांचेही मन हेलावले…

नाशिक: युवतीने आपल्या तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असे लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गंगापूर रोड परिसरात घडली आहे. दीक्षा दत्तू त्रिभूवन (वय २१) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत ाहेत.

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील ध्रुवनगरमध्ये राहणाऱ्या दीक्षा हिने घरात कुणीनी नसताना तिने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या तळहातावर आई-वडिलांसाठी खास संदेश लिहिला होता. तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असे लिहिले होते. हा मेसेज वाचून पोलिसही हेलावून गेले. रविवारी (ता. १८) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तिने गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Police-Book

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षा ही दिव्यांग होती. ती स्वभावाने अत्यंत शांत आणि अभ्यासू होती. तिच्या अशा अचानक जाण्याने त्रिभूवन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या मागे आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अभ्यासू आणि प्रेमळ दीक्षाने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने ध्रुवनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिक! वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर युवकाने मृत्यूला कवटाळले…

नाशिक! रिसॉर्टवर हळदीच्या दिवशीच वधूचा मृत्यू अन् तिथेच आठवडापूर्वी…

नाशिकमध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांना गंडा…

नाशिक हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुण हत्या…

नाशिक! एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडले; मृतांमध्ये दोन चिमुकले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!