
एकाच खोलीत दोन महिला खेळाडू आढळल्या मृतावस्थेत…
तिरुअनंतपुरम (केरळ): भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) वसतिगृहामध्ये दोन महिला प्रशिक्षणार्थी खेळाडू मृतावस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दोघींनी गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. कोलम जिल्ह्यात ही घटना घडली घडली आहे.
सँड्रा ए (१८ वर्षे) आणि वैष्णवी व्ही (१५) अशी आत्महत्या केलेल्या खेळाडूंची नावे आहेत. सँड्रा ही १२ वीत शिकत असून ती ॲथलेटिक्सची प्रशिक्षणार्थी होती, तर वैष्णवी १० वीत शिकत असून ती कबड्डीची खेळाडू होती. गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास नेहमीप्रमाणे सरावाची वेळ झाली, मात्र या दोघी मैदानावर पोहोचल्या नाहीत. त्यामुळे वसतिगृहातील इतर विद्यार्थिनींनी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघींनी एकाच खोलीत वेगवेगळ्या पंख्यांना बेडशीटच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे, वैष्णवी ही दुसऱ्या खोलीत राहायची, परंतु बुधवारी रात्री ती सँड्राच्या खोलीतच झोपली होती. रात्री १२:३० वाजेपर्यंत इतर विद्यार्थिनींनी या दोघींना एकत्र पाहिले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून खोलीची कसून झडती घेतली, मात्र तिथे कोणतीही ‘सुसाईड नोट’ सापडलेली नाही. त्यामुळे या दोन्ही महिला खेळाडूंनी अशाप्रकारे टोकाचं पाऊल का उचललं? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वसतिगृहातील इतर खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात असून, पुढील तपास सुरू आहे.
पुणे! संक्रांतीच्या दिवशीच ट्रकच्या धडकेत सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू…
सातारा! जवान विकास गावडे यांना पाणी पाजतानाचा क्षण काळजात चर्रर्र करून गेला…
सोलापूर! पोलिस पत्नीने शेवटचा मेसेज करून उचललं टोकाचं पाऊल…
पुणे! मारण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली; बियर अन् सिगारेटची पार्टी केली अन् 4 तास हत्येचा थरार…

