पुणे! टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर लावला मोक्का; दणाणले धाबे…

पुणे: पुणे शहरातील हडपसर परिसरातील काही भागात सातत्याने दहशत माजवणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर वचक बसावा, यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर पाऊल उचलले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हडपसरमधील सय्यदनगर आणि काळेपडळ परिसरात भाईगिरी करणाऱ्या रिझवान ऊर्फ टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या टोळीने सय्यदनगरमधील एका जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा केला होता आणि तिथे पत्र्याचे शेड उभारले होते. जेव्हा तक्रारदार महिलेने आपली जागा रिकामी करण्यास सांगितले, तेव्हा या गुंडांनी तिला धमकावण्यास सुरुवात केली. जागा सोडायची असेल तर 25 लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्यांनी केली. पैसे दिले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांनी महिलेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता.

टिपू पठाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर आतापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणे आणि खंडणी उकळणे यांसारखे तब्बल 25 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची ही वाढती गुंडागर्दी लक्षात घेऊन काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी या संदर्भातील प्रस्ताव पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्याकडे पाठविला होता.

अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी या प्रस्तावाची सखोल पडताळणी केली. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कुख्यात टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत म्हणजेच ‘MCOCA’ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर मोक्का लावल्यामुळे परिसरातील इतर गुन्हेगारांचेही धाबे दणाणले आहेत.

पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या तिन्ही पोरांची काढली धिंड…

पुणे! मोमोजचा व्यवसायातून घेतली थार कार अन् सहा मित्रांची ट्रिप ठरली शेवटची…

पुणे स्टेशनवर महिलेसोबत ओळख अन् घरी आणल्यावर बाप-लेकाचं कांड…

पुणे शहरात दिवसाढवळ्या कॉलेज परिसरात युवकाची हत्या…

पुणे! शिवाजीनगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारास सापळा रचून केले जेरबंद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!