लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाणला जामीन मंजूर…

नाशिक : भारतीय लष्करातून बडतर्फ करण्यात आलेल्या चंदू चव्हाण यास नाशिक रोड सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या जुलै महिन्यात त्यास देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली होती.

चंदू चव्हाण याने सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय सैन्याची बदनामी करीत जवानांना वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. चंदू बाबूलाल चव्हाण (रा. मोहाडी, जि. धुळे) असे लष्करातील बडतर्फ जवानाचे नाव आहे. चंदू चव्हाण यास देवळाली कॅम्प पोलिसांनी धुळ्यात ११ जुलै २०२५ मध्ये अटक केली होती. त्यानंतर त्यास नाशिक रोड सत्र न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. नाशिक रोड सत्र न्यायालयाकडे त्याने जामिनासाठी अर्ज केला असता, त्यावर सरकार पक्ष व बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला. न्या. केदार जोशी यांनी शुक्रवारी (ता. १४) अटी-शर्थीसह जामीन मंजूर केला आहे. अॅड. अपर्णा पाटील यांनी सरकारपक्षातर्फे, तर अॅड. प्रतीक ताजनपुरे यांनी बचाव पक्षातर्फे बाजू मांडली.

…अशा आहेत अटी-शर्ती
– ७५ हजारांचे जातमुचलक्यावर जामीन मंजूर
– भारतीय लष्कराविरोधात भाष्य करू नये
– भारतीय लष्कर, प्रशासनाचा आदर आवश्यक
– सोशल मीडियावर भारतीय लष्कराविरोधात मतप्रदर्शनाला बंदी
– न्यायालयीन कामकाजावेळी उपस्थिती बंधनकारक
– शासनाविरोधात गैरवर्तन टाळावे

लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांना अटक…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!

सांगलीचे सुपुत्र लेफ्टनंट अथर्व कुंभार यांना प्रशिक्षणादरम्यान वीरमरण…

माजी जवान चंदू चव्हाण यांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!