
लातूरमध्ये भरदिवसा शिक्षकाची छातीत सुरा खुपसून हत्या…
लातूर: लातूर शहरात एका शिक्षकाच्या छातीत सुरा खुपसून त्यांचा निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. १०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
लातूर शहरातील ही घटना मेघराजनगर परिसरात घडली. रामेश्वर बाबू बिरादार (वय ३५, सावरगाव, ता. देवणी) असे हत्या झालेल्या शिक्षकाच नाव आहे.
शिक्षक रामेश्वर बिरादार हे शुक्रवारी काही कामासाठी लातूर शहरात आले होते. दुपारच्या वेळी ते मेघराजनगर परिसरातून जात असताना, संशयित आशिव शिंदे (वय २१) याने त्यांना वाटेत अडवले. आशिव शिंदे याने बिरादार यांच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या बिरादार यांनी त्याला तत्काळ १०० रुपये काढून दिले. मात्र, एवढ्यावरच न थांबता संशयित शिंदे याने त्यांच्याजवळील आणखी पैसे आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी बिरादार यांनी विरोध केल्याने दोघांमध्ये झटापट सुरू झाली. याच झटापटीदरम्यान, संशयित आशिव शिंदे याने आपल्याजवळ असलेला चाकू काढून रामेश्वर बिरादार यांच्या छातीत क्रूरपणे खुपसला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
बिरादार यांना गंभीर जखमी अवस्थेत तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी तत्काळ संशयित आशिव शिंदे याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, बिरादार यांना काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत गुरधाळ येथील जिल्हा परिषद शाळेवर सहशिक्षक म्हणून नोकरी मिळाली होती. त्यांची नुकतीच नोकरी लागल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. ते अविवाहित होते. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…
लातूर! सुटकेसमधील महिलेच्या मृतदेहाचं गूढ उलगडलं, खुनी निघाला…
धक्कादायक Video: लातूरमध्ये युवकाला नग्न करून बेदम मारहाण…
लातूरमध्ये जन्मदात्या आईवर कोयत्याने केले तब्बल 75 वार अन्…
लातूर हादरले! दोन सख्ख्या चुलत भावांची हत्या…

