पुणे! NDA मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) या प्रतिष्ठित संस्थेत विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. अंतरीक्ष कुमार (वय १८, मुळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अंतरीक्ष कुमार हा माजी सैनिकाचा मुलगा होता. त्याचे वडील भारतीय सैन्यात सेवेत होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत देशसेवेचे स्वप्न घेऊन अंतरीक्षने जुलै महिन्यात पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला होता. सध्या तो पहिल्या सत्रात शिक्षण घेत होता. आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास अंतरीक्षने आपल्या वसतिगृहातील खोलीत बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच एनडीए प्रशासनाने तातडीने उत्तमनगर पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात कोणतेही संशयास्पद पत्र (सुसाईड नोट) सापडलेले नाही. पोलिस विद्यार्थी मित्र, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांकडून चौकशी करून मानसिक ताण, शैक्षणिक दबाव किंवा वैयक्तिक कारणे होती का, याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अंतरीक्ष कुमार याने आज पहाटे त्याच्या खोलीतील बेडशीटने गळफास घेतला. मृतदेह ताब्यात घेतला असून, अंतरिक्षच्या कुटुंबालाही माहिती देण्यात आली आहे.अंतरिक्षने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास सुरू आहे. त्याच्या खोलीतून सुसाईड नोटही सापडली नाही. सध्या उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना IPS अधिकाऱ्याची आत्महत्या…

बीड! बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील नागरगोजे यांची आत्महत्या…

पुणे जिल्ह्यात विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या…

नवोदय विद्यालयाच्या शिक्षकाने केली आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले…

पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!