सांगलीत ‘स्पेशल 26’ स्टाईल दरोडा, डॉक्टरला संशय आला अन्…

सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे ‘स्पेशल 26’ या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे दोरड्याचा प्रकार घडला आहे. येथील एका प्रसिद्ध डॉक्टरच्या घरात बनावट आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लुटली आहे.

कवठेमहांकाळ शहरातील प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरी रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी सांगत चार व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी डॉक्टर म्हेत्रे यांना ‘सर्च वॉरंट’ दाखवले आणि घराची झडती घ्यायला सुरुवात केली. आम्ही तुमच्या घराती झडती घ्यायला आलोय, असे म्हणत संपूर्ण घर तपासायला सुरूवात केली.

चित्रपटात दाखवल्याप्रमाणे या बनावट अधिकाऱ्यांनी घरातून सुमारे 16 लाख रुपयांची रोकड आणि जवळपास 1 किलो वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 2 कोटी रुपयांचा ऐवज जप्त केल्याचे सांगितले. त्यानंतर तेथून पोबारा केला. मात्र, कारवाई सुरू असताना डॉक्टरांना संशय येत होता. आरोपींनी पोबारा केल्यानंतर डॉक्टर म्हेत्रे यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने कवठेमहांकाळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा छापा पूर्णपणे बनावट होता. त्यानंतर डॉक्टरांनी डोक्यालाच हात लावला. या तोतया आयकर अधिकाऱ्यांच्या धाडीमुळे सांगली जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सांगलीत खुन्नसवरून कुख्यात गुन्हेगाराला पाठलाग करुन जागेवरचं संपवलं…

सांगली! प्रेयसीने लव्ह स्टोरीचा केला वाईट पद्धतीने शेवट…

सांगलीत थरार! दिवसाढवळ्या पाठलाग करून कोयत्याने चिरला गळा…

सांगली! गर्भवती महिलेची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…

सांगली! गर्भवती महिलेची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!