धक्कादायक! डॉक्टर जावयाने सासूचा खून करून मृतदेहाचे केले १९ तुकडे; कारण…

बंगळूरू: कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यात कोरतगेरे येथे जावयाने सासूची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून प्लास्टिक बॅगेत भरून रस्त्याच्या कडेला फेकल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी शोध घेऊन आरोपी जावयाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. लक्ष्मी देवी (वय ४२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

कोलाला गावाजवळ 7 ऑगस्टच्या सकाळी काही लोक रस्त्यावरुन चालले होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका प्लास्टिक बॅग पाहिल्यानंतर धक्का बसला. बॅगमध्ये मानवी शरीराचे तुकडे होते. पोलिसांना याबाबातची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी शोध घेतला. पुढच्या दिवशी आणखी अशा सात बॅग सापडल्या. त्यात मानवी शरीराचे भाग आणि महिलेचं शीर मिळाले.

महिलेच जे शीर होतं, त्या आधारावर पोलिसांनी महिलेची ओळख पटवली. तिचं नाव लक्ष्मी देवी असल्याचे समोर आले. तपासात समोर आलं की, फक्त तिची हत्या केलेली नाही, तर मृतदेहाचे 19 तुकडे केले होते. या खळबळजनक हत्यांकाडाचा छडा लावण्यासाठी पोलिस अधीक्षक अशोक के. वी यांनी एक विशेष तयार केले. काही दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. लक्ष्मी देवीचा जावई डॉ. रामचंद्रप्पा एस आणि त्याचे दोन साथीदार सतीश के. एन. आणि किरण के यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपी आणि मृत महिलेचा जावई रामचंद्रप्पा याला आपल्या सासूच्या चारित्र्यावर संशय होता. लक्ष्मी देवीच्या कृत्यांमुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतोय असे त्याचे मत होते. संशय आणि रागापोटी रामचंद्रप्पाने मित्रांसोबत मिळून सासूच्या हत्येचा कट रचला. हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे करुन ते वेगवेगळ्या बॅगेत भरले. पुरावे मिटवण्यासाठी त्यांनी ते तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

प्रेम! मुलीसाठी शोधला जावई अन् जावयाला आवडली मुलीची आई…

जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…

सासूने होणाऱ्या जावयासह पळून जाण्याचं पोलिसांना सांगितलं खरं कारण…

सासू आणि जावयाच्या प्रेमसंबधातून बाळाचा झाला जन्म अन् पुढे…

सासू आणि जावयाच्या प्रेमसंबधातून बाळाचा झाला जन्म अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!