
पुणे जिल्ह्यात विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या…
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू जवळ एका विद्यार्थिनीने घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रणाली मधुकर नवले (वय १९) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
राहू गावा जवळ असलेल्या सोनवणे मळा (ता. दौंड) येथे शुक्रवारी (ता. ८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. बेडरूममध्ये नायलॉनच्या रसीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यासंदर्भात प्रणालीचा भाऊ प्रणव मधुकर नवले याने यवत पोलिसांना खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव याने त्याच्या मित्राला व आई-वडिलांना फोन करून घरी तात्काळ बोलावून घेतले. दरम्यान प्रणालीचे आई-वडील कामासाठी शेतात गेले होते. ग्रामस्थांच्या मदतीने दरवाजा उघडून प्रणालीच्या गळ्यातील दोरी कापून तिला खाली घेतले. प्रणाली हिला तातडीने पुढील उपचारासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अधिक तपास यवत पोलिस उपनिरीक्षक गोविंद भोसले करत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणामध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत यवत पोलिस अधिक तपास करत आहे.
पुणे! पत्नीचा कंपनीत छळ; हतबल नवऱ्याची गळफास घेत आत्महत्या…
पुणे पोलिसांनी तीन युवतींचा छळ केल्याचा आरोप; पाहा घटनाक्रम…
पुणे! लग्नाची बोलणी सुरू असताना फिरायला गेले अन् ठेवले शरीरसंबंध…
Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…
पुणे! पती-पत्नी दोघेही क्लास वन अधिकारी अन् संशयाचं घुसलं भूत…

