
सैराट! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून बेदम मारहाण अन् अपहरण…
पुणे: पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी येथे बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावांनी आपल्या दाजीला जबर मारहाण केली. शिवाय, आरोपींनी गावातील १५ ते २० जणांना सोबत घेत दाजीच्या घरावर हल्ला केला. यानंतर विवाहित बहिणीला जबरदस्तीने उचलून नेले आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विश्वनाथ बबन गोस्वामी (वय ३९) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात विवाहितेच्या दोन भावांसह आई आणि इतर १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंतरजातीय प्रेमविवाहाच्या कारणातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!
विश्वनाथ गोस्वामी याचे प्राजक्ता (वय २८) नावाच्या युवतीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह केला होता. पण हे लग्न मुलीच्या घरच्यांना मान्य नव्हते. याच कारणातून ३ ऑगस्ट रोजी विश्वनाथ यांना बेदम मारहाण करण्यात आली. पतीला मारहाण करून पत्नीचं अपहरण करतानाचा सर्व प्रकार एका स्थानिकाने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. ज्यात आरोपी विवाहितेला बळजबरीने घेऊन जाताना दिसत आहेत. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे. या घटनेमुले परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विश्वनाथ गोस्वामी म्हटले आहे की, मी गोसावी हिंदु असल्याने आणि ती मराठा हिंदु असल्याने आमच्या प्रेमविवाहाला विरोध झाला आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून आम्हाला धमकी देण्यात आली. ते सारखे म्हणायचे आम्ही उच्च आहोत तुम्ही आमचं नाक कापलं, मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही आम्ही तुम्हाला ठार मारू, अशाप्रकारे धमकी देण्यात येत होती. यासाठी वेळोवेळी एकट्यात तर कधी प्रवासात आम्हाला अडवून धमकी देण्यात आली. ज्या ज्या वेळी या घटना घडत होत्या त्यावेळी आम्ही खेड पोलीस स्टेशनला याबद्दल माहिती दिली.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
एकदा माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता, तर एकदा माझ्या बिल्डिंगच्या आवारात काही गुंड घुसले होते. त्यावेळी माझी पत्नी प्राजक्ताने यासंदर्भात खेड पोलिसात तक्रार दाखल केली होती. यावेळी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. परंतु, असं असताना हे सत्र सुरू राहिले. माझी 14 एकर शेती असून मी अनेक व्यवसाय करतो. तर माझी पत्नी इन्फोसिसला लीड मॅनेजर आहे. परंतु, या साऱ्यांचं त्यांना काही नाही, उलट आपल्या लेकीलाच मारून टाकण्याची धमकी प्राजक्ताच्या कुटुंबीयांनी दिली.
माझी पत्नी इमारतीवर असताना माझ्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला. म्हणून मी जिन्याने वर जातं असताना प्राजक्ताचा भाऊ गणेश काशीद आणि तिची आई सुशीला काशीद इत्यादीसह काही गुंड प्राजक्ताला फरपटत, तिचे केस ओढत इमारतीतून खाली घेऊन जात होते. मी अडवण्याचा प्रयत्न केला असता प्राजक्ताच्या भावाने मला लोखंडी रॉडचा फटका मारला, चावा घेतला. यानंतर मी हतबल झालो आणि त्यांच्यापुढे काही करू शकलो नाही. त्यानंतर माझ्या पत्नीला घेऊन हे लोकं पसार झाले आहेत. याबाबत मी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप त्या संदर्भात कुठलीही माहिती आम्हाला मिळालेली नाही. अशी माहिती विश्वनाथ गोस्वामी यांनी दिली. सोबतच माझ्या पत्नीचा दगाफटका तर झाला नाही ना, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
सैराटची पुरावृत्ती! वडील आणि मलगी समोरासमोर आली अन् नको ते घडलं…
सैराट! प्रेमविवाह करताच २४ तासातच नवरीची केली हत्या…
सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याचा रागातून जावयाला क्रूरपणे संपवलं…
‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…
प्रेमाची सैराट कहाणी! बहिणीचा ड्रायव्हरसोबत पळून प्रेमविवाह अन् पुढे…

